बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते परेश रावल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले बघायला मिळतात. परेश यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच अनेक विषयांवर ते परखडपणे मतही मांडत असतात. काही दिवसांपूर्वी परेश यांनी x वर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत येत आहे. यामध्ये त्यांनी कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल भाष्य केले होते. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी परेश यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी परेश यांच्या पोस्टवर नाराजीदेखील दर्शवली आहे. परेश यांची कोणती पोस्ट आहे त्याबद्दल जाणून घेऊया. (paresh rawal on rahul gandhi)
दरम्यान जाफर नावाच्या एका व्यक्तीने कॉँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुल गांधी व AI द्वारा एका गाढवाचा फोटों तयार करण्यात आला आहे. तसेच हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “कोणी या फोटोमधून गाढवाला काढू शकता का?”, परेश यांनी हा फोटो रिशेअर केला आणि लिहिले की, “म्हणजे तुम्हाला ही फ्रेम पूर्ण रिकामी करायची आहे का?”. परेश यांची ही रिशेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. यावर अनेक नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दर्शवल्या आहेत.
You mean empty the frame ? https://t.co/H41C98lGob
— Paresh Rawal (@SirPareshRawal) January 12, 2025
नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. एकाने लिहिले की, “यामध्ये दोन आहेत. आता मला हे पण काढण्यासाठी सांगत आहात”. तसेच अजून एकाने लिहिले की, “जोपर्यंत हे परेश रावल आहेत हे समजत नाही तोपर्यंत ही पोस्ट सामान्य आहे”. मात्र काही लोकांना परेश यांची ही प्रतिक्रिया आवडली नाही. त्यावेळी एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हे खूप क्रूर आहे”. तसेच जून एकाने लिहिले की, “असं करण्याचा अधिकार कोणी दिला?”. परेश हे अभिनयाबरोबरच राजकारणातदेखील सक्रिय आहेत. ते २०१४ साली अहमदाबाद येथून भाजपाकडूनण निवडून आलए होते.
परेश यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ‘सरफिरा’, ‘जो तेरा है वो मेरा है’ या चित्रपटांमध्ये दिसून आले होते. तसेच लवकरच ते ‘बतमीज दिल’, ‘थामा’, ‘द ताज स्टोरी’, ‘भूत बंगला’, ‘वेलकम टु द जंगल’ व ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहेत.