झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. या मालिकेतील त्याची श्री ही भूमिका चांगलीच गाजली. मालिकाविश्वात महत्त्वपूर्ण कामगिरी करत शशांकने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. याशिवाय त्याने अनेक चित्रपट, वेबसीरिज, नाटक यांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. सध्या शशांक ‘मुरांबा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. बरेचदा तो त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसतो. कुटुंबाबाबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो तसेच त्यांच्याबरोबरचे अनुभव तो शेअर करत असतो. (shashank ketkar emotional post)
अशातच त्याने आजोबांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याने आजोबांचा जुना फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आज तुम्ही आठवण येत असल्याचेही त्याने म्हटलं आहे. या पोस्टमध्ये शशांकने असं म्हटलं आहे की, “आज माझ्या आजोबांचा १०० वा वाढदिवस. तुम्ही जरी प्रत्यक्ष समोर नसलात, तरी तुमची आठवण रोज येते. आमच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद कायम राहूदे”. तसंच या पोस्टसह त्याने अनेक दु:खी इमोजी जोडलेले आहेत. त्यामुळे अभिनेता आपल्या दिवंगत आजोबांच्या आठवणीत भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात डोहाळे जेवण, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
शशांक सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपल्या वैयक्तिक घटना शेअर करत असतोच. याशिवाय तो अनेक सामाजिक व्हीसी राजकीय विषयांवरही अगदी बिनधास्त व बेधडकपणे आपली मतं मांडतो. त्याच्या या मतांना अनेकदा यशही आलेले पाहायला मिळाले आहे. अभिनेत्याने रस्ते, रस्त्यावरील खड्डे, कचरा, अनधिकृत बांधकाम, याविषयी अनेकदा भाष्य केलं असून त्याने कार्यवाहीची मागणीही केली आहे. त्याचबरोबर त्याच्या या मागणीअआ यशही आले आहे.
दरम्यान, अभिनेता लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. २०२५ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने ही गुडन्यूज सर्वांबरोबर शेअर केली. शशांक २०१७ साली प्रियांका ढवळेबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यांना ऋग्वेद नावाचा मुलगाही आहे. मुलाबरोबरचे अनेक फोटो व गमतीशीर व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. “२०२५ चं स्वागत यापेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही” असं म्हणत त्याने ही खुशखबर शेअर केली होती.