बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी हे नेहमी चर्चेत असतात. ‘मिर्झापूर’ सीरिजमधील कालीन भय्या ही भूमिका त्यांची विशेष गाजली. या सीरिजमधील त्यांच्या भूमिकेला चाहत्यांचे खूप प्रेमदेखील मिळाले आहे. त्यांनी याबरोबरच हिंदीमधील अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांचे खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिले. ते खऱ्या आयुष्यात कालीन भय्यापेक्षा अगदी वेगळे आहेत. त्यांनी प्रेम विवाह केला असून याबद्दल ते आपुलकीने सांगताना दिसतात. अशातच त्यांनी खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल दिलखुलासपणे सांगितले आहे. पंकज यांच्याबद्दलच्या काही गोष्टी आपण आता जाणून घेऊया. (pankaj tripathi wife statement)
पंकज यांचे मृदुला यांच्याबरोबर लग्न झाले होते. त्यांचा मृदुला यांच्याबरोबर प्रेमविवाह झाला होता. एका अभिनेत्याबरोबर लग्न करणं तितकं सोपं नाही असं मृदुला यांच्या आई-वडिलांना वाटलं होतं. पण दोघांनीही त्यांच्या आई-वडिलांना लग्नासाठी तयार केले. पण तरीही त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. याबद्दल त्यांनी नुकतीच एका मुलाखतीमध्ये याबद्दलचा खुलासा केला. यावेळू मृदुला यांनी सांगितले की, “पंकज यांना भावा-बहिणींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात पाहिले होते. त्याचवेळी पंकज आवडले होते.
पुढे त्यांनी सांगितले की, “त्यावेळी मी नववीमध्ये होते आणि पकंज ११ वीमध्ये होते. तेव्हाच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो पण कुटुंबियांपासून लपवावे लागले होते. त्यावेळी एका मुलाने व मुलीने एकमेकांबरोबर बोलणं चुकीचं समजलं जायचं. पण त्यावेळी आईला आमचं संशय आला होता. त्यामुळे तिने पंकज यांना दादा बोलण्यास सांगितले होते. पण मी त्यांना दादा म्हणू शकत नव्हते त्यामुळे मी पंकजजी म्हणायला सुरुवात केली”.
त्यांनी नंतर सांगितले की, “आमच्यामध्ये उच्च आणि नीच जात असा फरक केला जातो. खालच्या जातीच्या महिलेशी विवाह करणं कुटुंबात मान्य नव्हतं. त्यामुळे मी जेव्हा घरी सांगितले तेव्हा घरातील सगळ्यांनाच धक्का बसला. पण नंतर घरच्यांनी आमचं नातं स्वीकारलं. मात्र आई व वाहिनीला आमच्या नात्यामुळे खुश नव्हते. आतादेखील माझ्या सासूबाईंना आमचं नातं मान्य नाही. पण आम्ही आता काहीही करु शकत नाही”. दरम्यान पंकज व मृदुला यांचा सुखाचा संसार सुरु आहे.