Dangal Box Office Collection : आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘दंगल’ चित्रपटामध्ये कुस्तीपटू महावीर फोगटच्या कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती. एक बाप आपल्या मुलींना कुस्ती शिकवतो आणि त्यांना कसे पुढे घेऊन जातो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत दिसला होता. आमिर खानसह चित्रपटात फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जायरा वसीम, साक्षी मलिक, अपारशक्ती खुराना ही कलाकार मंडळीही होती. हा चित्रपट नितीश तिवारी यांनी बनवला होता आणि या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाईदेखील केली होती. चित्रपटाने जवळपास २००० कोटींची कमाई केली होती.
या चित्रपटातून फोगट कुटुंबीयांना खूप प्रेम व आदर मिळाला. हा चित्रपटही सर्वांना खूप आवडला होता. पण २००० कोटी कमावणाऱ्या या चित्रपटात ज्या कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती त्यांना किती पैसे मिळाले हे तुम्हाला माहिती आहे का?, याचा खुलासा खुद्द बबिता फोगटने केला आहे. नुकतेच एका मुलाखतीत बबिता फोगटला विचारण्यात आले की, ‘दंगलने २००० कोटी कमावले होते आणि फोगट कुटुंबाला फक्त १ कोटी मिळाले?’. त्यावर बबिता यांनी होकारार्थी मान हलवली.
आणखी वाचा – अरमान मलिकने गुपचूप उरकलं चौथं लग्न?, मुलांना सांभाळणाऱ्या व्यक्तीशीच जुळलं प्रेम, पायल-कृतिकाचं काय होणार?
बबिता म्हणाली की, “आम्हाला एक कोटी रुपये देण्यात आले”. ती पुढे म्हणाली की, “माझ्या वडिलांनी एकच सांगितले होते, या सर्व गोष्टी सोडा, आम्हाला लोकांचे प्रेम व आदर हवा आहे. लोकांनी आम्हाला भरभरुन प्रेम दिले”. बबिता फोगटची कुस्तीमध्ये चमकदार कारकीर्द आहे. तिने २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि २०१४ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २०१२ मध्ये तिने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
आणखी वाचा – Video : मृण्मयी देशपांडेची महाबळेश्वरमधील घरात सुरु आहे धमाल, करणार स्ट्रॉबेरीची शेती, दाखवला संपूर्ण परिसर
२०१९ मध्ये बबिता फोगटने व्यावसायिक कुस्तीतून निवृत्ती घेतली आणि राजकारणात प्रवेश केला. याशिवाय ती टीव्ही रिॲलिटी शो ‘नच बलिए ९’ मध्ये दिसली होती. तिने आपल्या नृत्याविष्काराने साऱ्यांना खूप प्रभावित केले. याशिवाय ती फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या ‘बँड बाजा ब्राइड विथ सब्यसाची’ या शोमध्ये दिसली होती.