रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पुन्हा सुरु होणार CID, सहा वर्षांनंतर व्हिडीओमधून पहिली झलक समोर, प्रोमो कधी येणार?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 24, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
CID show promo

CID पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

सोनी वाहिनीवरील सीआयडी (CID) ही मालिका सगळ्यांनाच माहित आहे. या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. १९९८ ते २०१८ पर्यंत म्हणजेच तब्बल २० वर्ष ही मालिका चालली. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, फ्रेडी यांच्याबरोबरच इतर सर्वच पात्र गाजली. प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या केस सोडवताना प्रेक्षकही टीव्हीसमोर बसून असायचे. ‘कुछ तो गडबड है दया’, ‘दया तोड दो दरवाजा’ हे डायलॉगही प्रचंड गाजले. मात्र कालांतराने या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामुळे अनेक चाहते नाराज झाले. तसंच अनेकदा ही मालिका नव्याने सुरु व्हावी याबद्दल इच्छाही व्यक्त केल्या गेल्या. अशातच आता सीआयडीबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. (CID show promo)

पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची पहिली झलक आता प्रेक्षकांच्या समोर आली आहे. यामध्ये एसीपी प्रद्युम्न बघायला मिळत आहेत. त्यांचा एक वेगळाच अवतार बघायला मिळत आहे. तसेच इन्स्पेक्टर द्याचीदेखील जबरदस्त भूमिका बघायला मिळत आहे. नुकताच या शोच्या प्रोमोची तारीख समोर आली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये एक उत्साह बघायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘दंगल’ने २००० कोटी रुपये कमावले पण फोगाट कुटुंबियांना मिळाले फक्त एक कोटी, आमिर खानवर बबिता फोगाटचे गंभीर आरोप

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

आवडता कार्यक्रम समोर येणार असल्याने सोशल मीडियावर नेटकरी आनंद व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “माझ्या बालपणीचा आवडता कार्यक्रम”, तसेच दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया दिली की, “खूप उत्सुकता लागली आहे”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “अरे हे कसं झालं, कधी झालं, का झालं”, नंतर अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “मस्त, आम्ही या शोची खूप वाट बघत होतो. पण पुन्हा एकदा हा शो बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं”.

आणखी वाचा – Video : पारंपरिक अंदाजात स्वागत, ओवाळलं अन्…; डिपीच्या घरात इरिनाचा थाटामाटात पाहुणचार, व्हिडीओ व्हायरल

सीआयडी सोनी टीव्हीवरील सर्वात यशस्वी मालिका आहे. मालिकेने यशस्वीपणे २० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहेत. २० वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेचा आजही मोठा चाहता वर्ग आहेत. सीआयडी हा शो विविध विक्रमांसाठीही ओळखला जातो. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही या शोची नोंद आहे. अशातच आता हा शो मराठीमध्ये येत असल्यामुळे अनेक चाहते उत्सुक आहेत.  

Tags: cidpopular showtelevision show
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Actress Pooja Pawar shares a fans story about her negative role in zee marathi serial Karbhari Laybhari

"हिला मारा अशा बायका मला बोलायच्या आणि…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाल्या, "भीती वाटायची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.