सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारी जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली ही जोडी आहे. मुग्धा व प्रथमेशने आजवर त्यांच्या गायनाने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावरुन दोघेही नेहमीच काहीना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. विशेष ही जोडी चर्चेत राहिली ती म्हणजे मुग्धा व प्रथमेशच्या लग्नामुळे. आमचं ठरलं म्हणत थेट प्रेमाची कबुली देत या जोडीने चाहत्यांना सुखद धक्का दिला. (Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Video)
मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्न सोहळ्यामुळे विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळाले. दोघांच्या शाही विवाहसोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर कोणताच ब्रेक न घेता या जोडीने लगेचच कामाला सुरुवात केलेली पहायला मिळाली. मुग्धा व प्रथमेश कामानिमित्त बरेचदा दौरे करताना दिसतात. अनेकदा ते एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. अशातच सध्या मुग्धा ही कामानिमित्त घरापासून दूर असलेली पाहायला मिळत आहे.
मुग्धा व प्रथमेश दोघेही दत्तभक्त असून ते कायमच दत्त सेवेत रमलेले दिसतात. प्रथमेश हा मूळचा कोकणातील आहे. मुग्धाच सासर कोकणातील असून ती बरेचदा कोकणात ये जा करताना दिसते. सासरच्या घरी मुग्धा, प्रथमेश भजन करताना दिसतात. दर गुरुवारी लघाटे यांच्या घरी दत्तगुरुंची सेवा केली जाते.मुग्धा व प्रथमेश दोघेही दत्तसेवा करण्यात नेहमीच व्यग्र असल्याचं पाहायला मिळत. लग्नानंतरही दोघांनी प्रथमेशच्या गावच्या घरी दत्तजयंतीनिमित्त दत्तसेवा करत भजनाचा कार्यक्रम केलेला पाहायला मिळाला.
आणखी वाचा – “नराधमांना कधी शिक्षा मिळणार?”, बलात्कार प्रकरणांवर तेजश्री प्रधानचा सवाल, म्हणाली, “आता समाजात…”
आता प्रथमेश हा मूळ गावी असून मुग्धा कामानिमित्त सासरपासून दूर आहे. मुग्धाने याबाबतची पोस्ट शेअर करत सासरला, प्रथमेशला मिस करत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन गावच्या घरातील भजनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेशसह मुग्धाही भजनात दंग झालेली दिसत आहे.