छोट्या पडद्यावरील सुपरहिरो ‘शक्तिमान’ ही मालिका ९०च्या दशकात खूप लोकप्रिय होता. लहानग्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत ही मालिका लोकप्रिय होता. या मालिकेला अनेक वर्ष झाली असली तरी हा शो आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’च्या भूमिकेत प्रेक्षकवर्गामध्ये छाप पाडली. आता हे पात्र मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी सुरु झाली आहे. लवकरच शक्तिमान हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. (Mukesh Khanna on Ranveer Singh)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंह ‘शक्तिमान’च्या व्यक्तिरेखेवर आधारित चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र, रणवीर सिंहला ‘शक्तीमान’च्या भूमिकेसाठी कास्ट केल्याच्या वृत्तामुळे मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला आहे. मुकेश खन्ना यांनी रणवीरला आयकॉनिक भूमिकेसाठी कास्ट करण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘शक्तिमान’च्या भूमिकेसाठी रणवीर सिंहच्या कास्टिंगच्या अफवांवर मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपला राग व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – “आजही सोनू निगमच्या पाया पडतो”, अवधूत गुप्तेचा खुलासा, म्हणाला, “एकदा एखाद्याला…”
मुकेश खन्ना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सोशल मीडियावर अनेक महिन्यांपासून रणवीर शक्तीमान साकारणार असल्याची चर्चा होती आणि प्रत्येकजण याबद्दल नाराज होता, मीदेखील गप्प राहिलो. पण जेव्हा वाहिन्यांनी रणवीरला साइन केल्याची घोषणा सुरु केली तेव्हा मला तोंड उघडावे लागले. आणि मी म्हणालो की अशी प्रतिमा असलेला माणूस कितीही मोठा स्टार असला तरी तो शक्तीमान होऊ शकत नाही. मी माझी पावले मागे घेतली आहेत. आता बघूया पुढे काय होते?”.
रणवीर सिंहच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमुळे खन्ना यांनी हा आक्षेप घेतला आहे. रणवीरने न्यूड फोटोशूट केले होते, ज्यावरुन बराच वाद झाला होता. ‘बालिश’ असं वर्णन करत शक्तीमानसारख्या भूमिकेसाठी तो योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतरच्या YouTube व्हिडीओमध्ये खन्ना यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि रणवीरला सल्ला दिला की, जर त्यांना त्यांची शरीरयष्टी दाखवायची असेल, तर त्यांनी नग्नता प्रचलित असलेल्या इतर देशांतील भूमिका शोधल्या पाहिजेत. ते म्हणाले, “तुम्ही जा आणि स्पेनसारख्या फिनलँडसारख्या दुसऱ्या देशात राहा. तिथे न्युडिस्ट कॅम्प आहेत. तिथे जा. अशा चित्रपटांमध्ये काम करा जिथे तुम्हाला प्रत्येक तिसऱ्या सीनमध्ये न्यूड सीन करायला मिळेल”. मुकेश खन्ना यांच्या या पोस्टनंतर नवा वाद निर्माण होऊ शकतो.