प्रत्येक कलाकार हा आपल्या कामाच्या कौतुकाचा भुकेला असतो. कोणत्याही कलाकाराला आपण करत असलेल्या कामाचे कौतुक किंवा प्रशंसा होणे हे आवडतच असते. किंबहुना आपल्या चाहत्यांने आपण करत असलेल्या कामाचे कौतुक व्हावे याचसाठी मेहनत घेत असतो. असाच एक मेहनती कलाकार म्हणजे समीर चौघुले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून समीर घराघरांत पोहोचले आहेत.
समीर चौघुले यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. त्यामुळे त्यांचं चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. त्यांचं प्रत्येक स्किट प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. आपल्या लेखणीने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे समीर आता महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यात पोहोचले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील त्याच्या अनेक भूमिका व स्किट्सची नेहमीच चर्चा होत असते. त्यातही ‘शिवाली हे खरंय” या स्किट्सने तर चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.

समीर चौघुले यांच्या या स्किट्सची केवळ घराघरांतच नव्हे तर विमानतळावरही तितकीच चर्चा होते. समीर यांचे स्किट्स हे केवळ घरात नाही तर विमानतळावरही पाहिले जातात. समीर चौघुले यांनी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात नागपूरच्या विमानतळावर त्यांचे व शिवालीचे ‘शिवाली हे खरंय’ स्किट्स चालू असलेले दिसत आहे. समीर यांनी या चालू असलेल्या स्किटबरोबर स्वत:चा एक सेल्फी फोटोही काढला आहे.
आणखी वाचा – “आजही सोनू निगमच्या पाया पडतो”, अवधूत गुप्तेचा खुलासा, म्हणाला, “एकदा एखाद्याला…”
कोरोना काळात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील अनेक स्किट्स विमानतळावर दाखवण्यात आले होते. अशातच आताही विमानतळावर स्वत:चे चालू स्किट्स बघून समीर यांना स्वत:चा फोटो काढण्याचा मोह आवारला नाही. दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील कलाकारांनी नुकतंच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. तिकडे भरपूर धमाल, मजामस्ती करुन ते मुंबईत परतले आहेत.
दरम्यान, समीर चौघुले यांनी यापूर्वी अनेक नाटक, चित्रपट व मालिकांतून वेगवेगळी पात्रे साकारली आहेत. तसेच याआधीही त्यांनी अनेक विनोदी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.