शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनुष्का शर्मा व विराट कोहली लेकीसह असा घालवतात सुट्टीचा दिवस, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “ती झोपली की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 18, 2024 | 11:18 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Anushka Sharma And Virat Kohli

अनुष्का शर्मा व विराट कोहली लेकीसह असा घालवतात सुट्टीचा दिवस, स्वतःच खुलासा करत म्हणाला, "ती झोपली की..."

अनुष्का शर्मा व विराट कोहली ही बॉलीवूड व क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी आहे. दोघांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्का व विराट यांनी दुसऱ्यांदा आई-बाबा झाल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली. दोघांची त्यांचा मुलगा अकायचे स्वागत केले. बाळाच्या जन्मादरम्यान दोघेही लंडनमध्ये होते. यानंतर विराट बऱ्याच दिवसांनी भारतात परतला आहे. दोघेही त्यांची मुलगी वामिकाबद्दल अनेकदा बोलतात. लेकीबरोबरचे अनेक फोटो ते त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअरही करतात. (Anushka Sharma And Virat Kohli)

अनुष्का व विराट दोघेही त्यांच्या दोन वर्षांची मुलगी वामिकाबरोबरच्या त्यांच्या रविवारच्या दिनक्रमाबद्दल २०२३ मध्ये, एका वेबलॉइडशी केलेल्या संवादादरम्यान बोलले होते. संभाषणादरम्यान, अनुष्का शर्माने विराट कोहलीला त्याच्या घरातील सर्वोत्तम रविवारच्या दिनचर्याबद्दल विचारले. यावेळी उत्तर देत त्याने त्याच्या कौटुंबिक अशी हृदयस्पर्शी कथा शेअर केली. यावेळी अनुष्काने तिच्या व्यस्त वेळापत्रकाकडे लक्ष वेधून गमतीने सांगितले की, रविवारसाठी पर्यायांची कमतरता नाही.

आणखी वाचा – “पाण्याचा नळ जरा चमकवा…”, ऐश्वर्या नारकरांनी घरातील व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याचा सल्ला, अभिनेत्री म्हणाली, “तो नळ चमकवण्यासाठी…”

विराटने त्याच्या रविवारच्या दिनक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, तो आपला दिवस फॅमिली रुममध्ये आरामात घालवतो, कॉफीचा कप घेऊन बसतो, त्याच्या मुलीबरोबर ब्लॉक्स बनवतो, खेळतो. विराट वामिकाबरोबर वेळ घालवण्याबाबत बोलला. त्याने सांगितले की, या सर्व प्रकारानंतर, जेव्हा वामिका झोपते तेव्हा दोघेही बसून एखादा टीव्ही शो पाहणं पसंत करतात. यावेळी बोलताना विराटने दक्षिण आफ्रिकेतील जंगल सफारीबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, ही अशी जागा आहे जिथे ते दोघेही त्यांच्या मुलीबरोबर भेट देण्याचा विचार करु शकतात.

आणखी वाचा – Ed Sheeranच्या मुंबईमधील कॉन्सर्टला पोहोचले मराठी कलाकार, मिताली मयेकर म्हणाली, “८ तास उभं राहिलो…”

दरम्यान, विराट व अनुष्का ही दोघे त्यांच्या लेकीविषयी अगदीच गोपनीयता राखत असल्याचे पाहायला मिळाले आहे. अनुष्का-विराट यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०२१ रोजी अनुष्काने एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव वामिका असे ठेवण्यात आले. त्यानंतर विराट-अनुष्काने त्यांच्या दुसऱ्या मुलाचं स्वागत केलं. त्यांचं नाव त्यांनी अकाय असे ठेवले आहे.

Tags: anushka sharmaanushka sharma and virat kohlianushka sharma and virat kohli daughterentertainmentvirat kohli
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Avadhoot Gupte talked about why he touch Sonu Nigam's feet and salutation see the details

"आजही सोनू निगमच्या पाया पडतो", अवधूत गुप्तेचा खुलासा, म्हणाला, "एकदा एखाद्याला..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.