शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचं निधन, चार महिन्यांमध्येच मोडला होता संसार, नक्की काय झालेलं?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 4, 2024 | 1:16 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actor Mithun Chakraborty's first wife Helena Luke passed away

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूकचे निधन

मनोरंजन सृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचे ३ नोव्हेंबर, रविवार रोजी निधन झाले. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘मर्द’मध्ये दिसलेली अभिनेत्री हेलेना गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहत होती, जिथे तिने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. काही वृत्तानुसार, ६८ वर्षीय अभिनेत्री हेलेना ल्यूक गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. तरीही तिने डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. (Mithun Chakraborty’s first wife passed away)

अभिनेत्री हेलेना ल्यूक या ७० च्या दशकात फॅशन जगतात एक प्रसिद्ध नाव होते. १९७९  मध्ये त्यांची मिथुन चक्रवर्तींबरोबर भेट झाली आणि काही काळ दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांनी लग्न केले. हेलेना व मिथुन यांचे १९७९ मध्ये लग्न झाले, तेव्हा मिथुन हे मोठे स्टार नव्हते. मिथुन व हेलेना यांचे लग्न होताच काही आठवड्यांनी त्यांच्यात भांडणे व्हायला सुरुवात झाली. त्यांतर लग्नाच्या ४ महिन्यांनंतर हेलेनाने मिथुनपासून घटस्फोट मागितला. स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हेलेनाने तिचे लग्न तुटण्याचे कारण सांगितले होते. त्यांचे लग्न तुटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मिथुनची योगिता बालीशी जवळीक वाढू लागली होती. दुसरीकडे मिथुन हेलेनाला तिचा एक्स बॉयफ्रेंड जावेद खानबद्दल टोमणा मारत असे.

आणखी वाचा – The Great Indian Kapil Show मधील विनोदी अभिनेत्यावर प्रेक्षक नाराज, तृप्ती डिमरीला विचारलं असं काही…; नेटकरी म्हणाले “हाच प्रश्न रणबीरला…”

मिथुन चक्रवर्तीपासून घटस्फोट घेतल्यानंतर हेलेनाने चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावले. १९८० मध्ये आलेल्या ‘जुदाई’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या अमिताभबरोबर ‘मर्द’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ब्रिटीश राणीची भूमिका केल्याबद्दल तिचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय अभिनेत्री ‘दो गुलाब’, ‘एक नया रिश्ता’, ‘साथ साथ’ आणि ‘आओ प्यार करें’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

आणखी वाचा – प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, नेमकं काय झालं?

दरम्यान, कालांतराने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा हेलेना यांना हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाले तेव्हा त्या अमेरिकेला गेल्या. अमेरिकेत राहून तिने डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करायला सुरुवात केली. अशातच आता अभिनेत्रीचे निधन झाले आहे.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Rupali Ganguly Husband Post

रुपाली गांगुलीवर सावत्र लेकीने गंभीर आरोप करताच नवऱ्याचं उत्तर, तिला खोटं ठरवलं, म्हणाले, "घटस्फोट झाला म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.