मोठ्या पडद्यावरुन घरा-घरात पोहोचलेला अभिनेता गोविंदा त्याच्या अभिनयामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.सध्या गोविंदा चित्रपटांपासून दूर असलेला दिसून येतो. मात्र त्याने 80 व 90 च्या दशकामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचवेळी त्याने सुनीताबरोबर लग्नगाठही बांधली. परंतु याबद्दल त्याने कोणालाही कळू दिले नव्हते. लग्नानंतर काही वर्षांनी याबद्दल सर्वांना त्यांच्या लग्नाबद्दल समजले. त्यानंतर अनेक वर्षांनी तो भाची आरती सिंहच्या लग्नात त्याची पत्नी व मुलांबरोबर दिसून आला होता. अशातच आता त्याची एक नवीन अपडेट समोर आली असून सगळ्यांनाच धक्का बसला. (govinda family)
मंगळवारी सकाळी त्याच्या पायाला अनवधानाने बंदूकीतून सुटलेली गोळी लागली. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या तो आयसीयूमध्ये असल्याची माहिती त्याने स्वतः दिली. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. या निमित्ताने गोविंदाच्या खासगी आयुष्याबद्दलचे अनेक खुलासेदेखील झाले आहेत. त्याचे कुटुंब खूप मोठे होते. सगळे एकत्र राहत होते. मात्र त्याच्या कुटुंबाला नजर लागली आणि त्याने कुटुंबातील 11 लोकांना गमावलं.
गोविंदाने एका मुलाखतीमध्ये मुलीच्या मृत्यूबद्दल भाष्य केले होते. त्याने सांगितले की, “मला एक मुलगीदेखील होती. मात्र वेळेच्या आधी तिचा जन्म झाला. त्यामुळे ती खूप अशक्त होती आणि त्यामुळेच तिचा अवघ्या चार महिन्यात मृत्यू झाला”. गोविंदाच्या आई-वाडिलांबद्दल सांगायचे झाले तर त्याच्या वडिलांचे नाव अरुण कुमार आहुजा होते. ते अभिनेते व निर्मातेदेखील होते. तसेच आईचे नाव निर्मलादेवी होते. त्या देखील अभिनेत्री व गायिका होत्या. तसेच तसेच काही वर्षांनी गोविंदाची बहीण पुष्पा आहुजा आनंद यांचे 2011 साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या भोजपुरी इंडस्ट्रीमधील नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. सध्या त्यांचा मुलगा विनय आनंद देखील भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करत आहे.
तसेच गोविंदाची दुसरी बहीण पद्मा शर्मा म्हणजे आरती सिंहची आई यांचे देखील कर्करोगाने निधन झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी गोविंदाचे भाऊजी व आरतीचे वडील आत्माप्रकाश यांचेदेखील कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर गोविंदाची बहीण जेव्हा जेवण बनवत होती तेव्हा गॅसचा स्फोट झाला आणि त्या 70% भाजल्या. उपचार केल्यानंतर त्या बऱ्या झाल्या.