Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा आता शेवटचा आठवडा राहिला आहे. हे पर्व संपायला शेवटचे काही दिवस राहिले असून आता स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात कलाकार मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. या पर्वाचा आता शेवटचा आठवडा असूनही स्पर्धक मंडळींमधील वाद काही संपत नाही आहेत. शेवटच्या आठवड्यातही स्पर्धक मंडळी भांडताना दिसत आहेत. दरम्यान, निक्की तांबोळी या स्पर्धकाने अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांशी वाद घातला. तिला इतर स्पर्धकांचे अनेक मुद्दे खटकताना दिसले. मात्र इतर स्पर्धकांनीही निक्कीला वेळोवेळी उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. अशातच समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्कीचा पारा पुन्हा एकदा चढलेला पाहायला मिळाला.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की व अंकिता यांच्यात वाजलं असल्याचं दिसत आहे. आणि निक्की अंकिताची जान्हवीकडे चुगली करताना दिसत आहे. काही दिवसांपासून निक्की अंकिताच्या हात धुवून मागे लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. सूरजला घर देण्यावरुन निक्कीने अंकिताला बरेचदा टोकलं आहे. निक्कीचा अंकितावर असलेला राग आता पुन्हा पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर जान्हवी व निक्की यांच्या मैत्रीत आलेला दुरावा आता संपताना दिसत आहे. दोघी पुन्हा एकदा बोलताना दिसत आहेत.
अशातच निक्कीने अंकिताची खटकलेली गोष्ट जाऊन जान्हवीला सांगितली आहे. निक्कीच्या या स्टॅन्डला जान्हवीने पाठिंबा दिलेला पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निक्की म्हणते, “तुला मी खरं सांगू का?, इतकं घाण दिसेल की तिचं पलटली आहे. आर्याच जेवण मी थांबवलं तेव्हा ‘बिग बॉस’ मला ओरडले. आणि तेव्हा हिने स्टॅन्ड घेतला हे अगदी योग्य होतं. आज ती स्वतः चुकली”. यावर जान्हवी म्हणते, “मुद्दा तुझा अगदी बरोबर होता”.
यानंतर निक्की म्हणते, “अन्न न विचारणं म्हणजे हेच झालं ना. तिने नाश्ता बनवलाच नाही. मग तिने ही ड्युटी का घेतली. तू सूरजचा टास्क करुन, तुझा टास्क हरून, सांगकाम्या म्हणून तू जेवण बनवलं. तू करत नाही असं म्हणून शकली असतीस पण तू तसं केलं नाहीस. ही मुलगी खूप कुचकी आहे. एक नंबरची कुचकी मुलगी आहे”.