मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोविंदाने एक-दोन नव्हे तर कुटुंबातील जवळच्या ११ सदस्यांना गमावलेलं, तेव्हा नक्की काय घडलं होतं?, हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 1, 2024 | 12:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
govinda family

गोविंदाने जवळच्या 11 सदस्यांना गमावला

मोठ्या पडद्यावरुन घरा-घरात पोहोचलेला अभिनेता गोविंदा त्याच्या अभिनयामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.सध्या गोविंदा चित्रपटांपासून दूर असलेला दिसून येतो. मात्र त्याने 80 व 90 च्या दशकामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचवेळी त्याने सुनीताबरोबर लग्नगाठही बांधली. परंतु याबद्दल त्याने कोणालाही कळू दिले नव्हते. लग्नानंतर काही वर्षांनी याबद्दल सर्वांना त्यांच्या लग्नाबद्दल समजले. त्यानंतर अनेक वर्षांनी तो भाची आरती सिंहच्या लग्नात त्याची पत्नी व मुलांबरोबर दिसून आला होता. अशातच आता त्याची एक नवीन अपडेट समोर आली असून सगळ्यांनाच धक्का बसला. (govinda family)

मंगळवारी सकाळी त्याच्या पायाला अनवधानाने बंदूकीतून सुटलेली गोळी लागली. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या तो आयसीयूमध्ये असल्याची माहिती त्याने स्वतः दिली. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. या निमित्ताने गोविंदाच्या खासगी आयुष्याबद्दलचे अनेक खुलासेदेखील झाले आहेत. त्याचे कुटुंब खूप मोठे होते. सगळे एकत्र राहत होते. मात्र त्याच्या कुटुंबाला नजर लागली आणि त्याने कुटुंबातील 11 लोकांना गमावलं.

आणखी वाचा – Govinda Injured in Gun Misfire : स्वतःच्याच चुकीमुळे गोविंदाच्या पायाला लागली गोळी, आयसीयुमधून शेअर केला ऑडिओ, म्हणाला, “गोळी काढण्यात आली आणि…”

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

गोविंदाने एका मुलाखतीमध्ये मुलीच्या मृत्यूबद्दल भाष्य केले होते. त्याने सांगितले की, “मला एक मुलगीदेखील होती. मात्र वेळेच्या आधी तिचा जन्म  झाला. त्यामुळे ती खूप अशक्त होती आणि त्यामुळेच तिचा अवघ्या चार महिन्यात मृत्यू झाला”. गोविंदाच्या आई-वाडिलांबद्दल सांगायचे झाले तर त्याच्या वडिलांचे नाव अरुण कुमार आहुजा होते. ते अभिनेते व निर्मातेदेखील होते. तसेच आईचे नाव निर्मलादेवी होते. त्या देखील अभिनेत्री व गायिका होत्या. तसेच तसेच काही वर्षांनी गोविंदाची बहीण पुष्पा आहुजा आनंद यांचे 2011 साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या भोजपुरी इंडस्ट्रीमधील नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. सध्या त्यांचा मुलगा विनय आनंद देखील भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मध्ये शिव ठाकरेची एंट्री, घरात येताच नतमस्तक झाला तर सूरजला उचलून घेत मारली मिठी

तसेच गोविंदाची दुसरी बहीण पद्मा शर्मा म्हणजे आरती सिंहची आई यांचे देखील कर्करोगाने निधन झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी गोविंदाचे भाऊजी व आरतीचे वडील आत्माप्रकाश यांचेदेखील कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर गोविंदाची बहीण जेव्हा जेवण बनवत होती तेव्हा गॅसचा स्फोट झाला आणि त्या 70% भाजल्या. उपचार केल्यानंतर त्या बऱ्या झाल्या.

Tags: bollywood actorgovindagovinda family
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 nikki tamboli

Bigg Boss Marathi : "अंकिता खूप कुचकी", निक्की-जान्हवीने मिळून अंकिताला केलं टार्गेट, नाश्ता न बनवण्यावरुन गोंधळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.