शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मानेवर मांस ठेवल्यानंतर वाघाने उडी मारली अन्…; एका सीनसाठी जीव धोक्यात ठेऊन काम करत होता बॉबी देओल, स्वतः केला खुलासा, म्हणाला, “त्याक्षणी वाघ…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 1, 2023 | 4:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bobby deol speaks on tiger fight sequence

Bobby deol speaks on tiger fight sequence

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. या चित्रपटात तो हटके भूमिकेत दिसणार आहे. पण या अगोदरही त्याने बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. बॉबीने १९९५ मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात बॉबीने केवळ रोमँटिकच नाही तर ॲक्शन हिरो म्हणूनही काम केलं होतं.  चित्रपटात त्याने फाईट सीक्वेन्ससह त्याने घोडेस्वारी करत तसेच वाघाशी लढतानाही दिसला आहे. या चित्रपटात त्याची सह-कलाकार ट्विंकल खन्ना ही देखील होती. या दोघांनाही त्यावेळी सर्वोत्कृष्ट पदर्पण म्हणून फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. या चित्रपटातील वाघाबरोबरच्या सीनबद्दल नुकताच त्याने खुलासा केला. (Bobby deol speaks on tiger fight sequence)

‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत बॉबीने चित्रपटाच्या सीक्वेन्सबद्दल सांगितलं. चित्रपटाच्या सीनबद्दल सांगताना बॉबी सांगतो, “आम्ही हा सीन इटलीत शूट केला होता. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की तिथे एक खासगी प्राणीसंग्रहालयतील एका प्रशिक्षित सायबेरियन वाघाला ठेवण्यात आलं आहे. त्यातील एका प्रशिक्षित वाघाबरोबर माझा हा सीन चित्रीत केला होता. चित्रीकरणापूर्वी ट्रेनरने त्या वाघाची नखं कापली होती. पण त्याच्या तोंडाला टाके घातले नव्हते. अशा परिस्थितीत या सीन शूट करणं खूप कठीण आणि माझ्यासाठी अगदी धोक्याचं होतं”.

आणखी वाचा – प्रवीण तरडेंची मांजरही वापरते मोबाईल, बायकोने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “पूर्ण एपिसोड…”

बॉबी सीनबद्दल सांगताना म्हणाला, “या चित्रीकरणादरम्यान तिथला हँडलर माझ्या मानेवर मांसाचा तुकडा ठेवत होता. जेणेकरून वाघ माझ्यावर उडी मारेल आणि त्यानंतर मी माझ्या हातांनी त्याला थांबवेल. त्याचे पंजे बरेच जड होते. आणि जेव्हा तो दमायचा तेव्हा तो त्याचे पंजे माझ्या खांद्यावर टाकून खाली खेचायचा”.

View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरेंनी असा साजरा केला बायकोचा वाढदिवस, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

पुढे तो हसत म्हणाला, “कुत्रा एखाद्याला चावला तरी व्यक्तीला वेदना होतात. पण सीनमध्ये तर मी त्या वाघाशी लढत होतो. त्याचं तोंड माझ्या मानेजवळ होतं पण त्या क्षणाला मी फक्त त्या शॉटचा विचार करत होतो”, असं सांगत तो सीन चित्रीत करण्यासाठी किती कठीण होता हे स्पष्ट केलं.

Tags: barsaatbobby deolbollywood actordebut filmtiger fight
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Ankita Lokhande and Vicky Jain Bigg Boss 17

"हे दोघे आधीच…", अंकिता लोखंडे व विकी जैनमधील वाद खोटं असल्याचा 'बिग बॉस'च्या स्पर्धकांचा आरोप, म्हणाले, "तुम्ही तुमचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.