हिंदी टीव्हीमधील लोकप्रिय, पण तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७वं सीझन सध्या सुरु आहे. अवघ्या दोन आठवड्यातच हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कलाकारांसह सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरे यात सहभागी झाले. त्याचबरोबर यंदाच्या सीझनमध्ये टीव्ही क्षेत्रातील काही प्रसिद्ध जोड्यादेखील बिग बॉसच्या घरात बंद झाले. याच शोमधील एका जोडीची सध्या बरीच चर्चा होत आहे. ती म्हणजे, अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन. अंकिता व विक्की या नव्या सीझनमध्ये सहभागी झाले असून सीझनच्या सुरुवातीपासून ही जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (Ankita Lokhande and Vicky Jain Bigg Boss 17)
अंकिता व विक्की बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वाद करताना दिसून आले. तसेच त्याचं अंकिताबरोबरच्या वर्तनामुळे अभिनेत्रीचे चाहते प्रचंड भडकले. मात्र, हे दोघं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा खटाटोप करत असल्याचं आरोप घरातील इतर सदस्य करत आहे. तसेच दोघांच्या घरातील वर्तनामुळे चाहतेदेखील प्रचंड संतापले असून त्यांनी या दोघांचा खरपूस समाचार घेत आहे. नील भट्ट, सना रईस खान, तसंच घरातून बाहेर पडलेली सोनिया बन्सल हे या दोघांवर जोरदार बरसले.
सनाचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला, ज्यात तिने अंकिताला चांगलेच सुनावले. ती या व्हिडिओमध्ये म्हणाली, “मला एकदा विकीने रूममधून बाहेर यायला सांगितलं. तेव्हा त्याने मला लांबलचक भाषण दिलं. तेव्हा मी त्याला समोरच बोलले की, तू मला काही सांगू नकोस. मला माहिती आहे मला काय करायचं आहे. त्यामुळे तू शांत बस्स!”, त्यावर त्याची पत्नी अंकिताने ती खोटारडी असल्याचं म्हणाली. पुढे ती म्हणते, “तुम्ही तुमचं खेळ ठरवून येतात आणि तुम्हाला वाटेल त्या गोष्टी करायच्या, त्यामुळेच तुम्हा दोघांमध्ये वाद होतात.” त्यानंतर अनेक जण सनाला शांत करत तिला बाहेर काढतात.
हे देखील वाचा – मानेवर मांस ठेवल्यानंतर वाघाने उडी मारली अन्…; एका सीनसाठी जीव धोक्यात ठेऊन काम करत होता बॉबी देओल, स्वतः केला खुलासा, म्हणाला, “त्याक्षणी वाघ…”
Sana literally bajood Vicky bhaiya left right center. 🔥
— 𝑪𝒉𝒂𝒓𝒍𝒐𝒕𝒕𝒆 (@letsexplorebird) October 31, 2023
She said : you don't just manipulate others but you even manipulate your wife. 😂#SanaRaeesKhan #BB17 #BiggBoss17 #BiggBosspic.twitter.com/eoXmhVaOwr
तर नील भट्टनेही या दोघांवर आरोप लावलेले आहे. ही जोडी सुरुवातीपासूनच एक एक वेगळा गेम खेळत आहे. ज्यामुळे ते दोघं एकमेकांना फारसा वेळ देत नाही. ते सुरुवातीला तक्रार करतील, कारण ते आमच्यासारखेच दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करणारे आहे. एकमेकांशी भांडायचं हे विकीचंच खेळ असल्याचं तो यावेळी म्हणाला. तर नुकताच घरातून बाहेर पडलेल्या सोनिया बन्सलनेही विकीवर जोरदार आरोप केले होते.
हे देखील वाचा – “वो चाँद की क्या जरुरत है…”, घटस्फोटादरम्यान मानसी नाईक साजरा करतेय करवा चौथ, नेटकरी म्हणाले, “नवऱ्याला सोडून दिलंस अन्…”
Neil Bhatt says, "Yeh dono (Vicky & Ankita) bahar se game banake aaye hain ki wo usko time nhi dega wo complain karegi kyun ki bahar yeh dono bhi humare jaise ek doosre main ghuse hue hote hain, aise nahi hain,"
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 31, 2023
Ye toh maine pehle din hi bola tha. Vicky Bhaiya ki startegy hogi…
दरम्यान, बिग बॉसच्या घरात ही जोडी अनेकदा एकमेकांशी वाद करताना दिसून आली. विकी तिच्यावर अनेकदा ओरडला, ज्यामुळे अभिनेत्रींच्या चाहत्यांसह नेटकरी प्रचंड भडकले होते. पण अंकिता-विकीचा हा प्रयत्न लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी होत असल्याचं इतर स्पर्धकांचे चाहते व नेटकरी सोशल मीडियावर म्हणत आहे. त्यामुळे या घरात आणखी काय काय पाहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे.