महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाला व कलकारांना प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. यामुळे बरेच कलाकार या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आले आहेत. त्यातील एक विनोदी सम्राट म्हणजे प्रभाकर मोरे. प्रभाकर यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यांनी साकारलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना बरंच आवडलं. त्यांनी विविध नाटकांमधूनही भूमिका केल्या आहेत. प्रभाकर सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. ते कामाबरोबर आपल्या अधिकाधिक वेळ कुटुंबालाही देताना दिसतात. बऱ्याचदा ते कुटुंबाबरोबरचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Prabhakar more share a video of him wife bday celebration)
प्रभाकर त्यांच्या बायकोसोबतही बऱ्याचदा विविध गाण्यांवर व्हिडीओ बनवत असतात. विविध ट्रेन्डींग गाण्यांवर त्यांचे रिल्स बरेच व्हायरल झाले आहेत. आताही त्यांनी त्यांच्या बायकोचा एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. निमित्त आहे ते म्हणजे त्यांच्या बायकोच्या वाढदिवासाचं. मंगळवारी त्यांच्या बायकोचा म्हणजे प्रेरणा यांचा वाढदिवस होता. त्याचं सिलेब्रेशन त्यांनी घरीच अगदी साध्या पद्धतीत केलं. पण त्यांच्या बायकोच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा होता.
यावेळी प्रेरणा यांच्यासाठी एक खास चॉकलेट बार व चेरींनी सजलेला केक आणला होता. प्रेरणा यांनी यावेळी डार्क शैवाळी रंगाचा ड्रेस घातला होता. ज्यावर गुलाबी रंगाच्या फुलांची प्रिंट केली होती. अगदी साध्या पद्धतीत पण छान प्रकारे वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळीही या सोहळ्याचा आनंद नेहमीप्रमाणे त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदी दिसला.
प्रभाकर हे मूळचे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. त्यांनी गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात सगळ्यांचं मनोरंजन केलं आहे. त्यांनी सुप्रसिद्ध निर्माते व लेखक संतोष पवार यांच्या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच नाटकांमध्ये काम करत सगळ्यांची मनं जिंकली आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या क्रार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. प्रेक्षकही त्यांच्यावर भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.