आपल्या अभिनय व सौंदर्याने ज्यांनी ८० चा काळ गाजवला, त्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याच चर्चेत आल्या आहेत. त्या याद्वारे नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यातील फोटो शेअर करतात. तसेच, त्यांच्या चित्रपटांमधील अनेक किस्सेदेखील त्या या माध्यमातून सांगत असतात. अशात अभिनेत्रीने एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आरोग्यासंदर्भात एक मोठी माहिती दिली आहे. ४० वर्षांपूर्वी झीनत अमान यांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांना दिसण्यास अडचण येत होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या डोळ्यांवरील शस्त्रक्रिया झाली असून नुकताच त्यांनी ही माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. (Zeenat Aman Surgery)
झीनत यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हे फोटोज शेअर केले. शेअर केलेला हा फोटो रुग्णालयातील असून ज्यामध्ये त्या त्यांच्या मुलासह दिसत आहेत. यावेळी अभिनेत्रीने या कठीण काळात आपल्याला साथ देणाऱ्या सहकलाकारांचे व रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहे. त्या पोस्टमध्ये म्हणतात, “१८ मे २०२३ ला मी वोग इंडियाच्या कसाठी शूट केले. आणि १९ मेला मी सकाळी लवकरच उठून एक बॅग पॅक केली. आणि लिलीला एक प्रेमळ मिठी मारत जहान आणि कारा मला रुग्णालयात घेऊन गेले.
त्या पुढे म्हणतात, “गेल्या ४० वर्षांपासून माझ्या खोलीत माझ्याबरोबर एक हत्ती राहत होता. त्या हत्तीला बाहेर काढायची वेळ आता आली आहे. मला पिटोसिस नावाचा आजार होता, जो काही काळापूर्वी एका अपघातामुळे झाला होता. त्यामुळे माझ्या डोळ्यांभोवतीच्या स्नायूंना इजा झाली होती. त्यामुळे, गेली अनेक वर्ष त्या डोळ्यांची पापणी आणखीनच खाली येत होती. पण काही वर्षांपूर्वी हा आजार इतका बळावला की, मला समोरचे दिसणे बंद झाले होते. जेव्हा एखाद्या कलाकाराचे करिअर त्याच्या दिसण्यावरून होत असेल. तर यात नाट्यमय बदल आणणे अतिशय कठीण असतं. मला माहिती आहे की, या आजारामुळे माझ्या संधी मर्यादित झाल्या आणि वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले. मात्र या चर्चा होत असतानाही मला या गोष्टीची कधीही कमतरता भासली नाही. या काळात अनेक दिग्गज माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी माझ्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला.”
हे देखील वाचा – अंकिता लोखंडेला रडताना पाहून नवऱ्याने मिठी मारत काढली समजूत, अमृता खानविलकर व्हिडीओ शेअर करत म्हणते, “तू खूप…”
“त्या अपघातावेळी आणि त्यानंतरही माझ्यावर अनेक उपचार सुरु होते, पण ते सर्व अयशस्वी ठरले. मग पुढे यावर्षीच्या एप्रिल महिन्यात एका प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञांनी याबद्दलची माहिती दिली. मी अनेक काळापासून यामुळे विचलित झाले. पण काही काळानंतर अनेक चाचण्यांना सामोरे जात या शस्त्रक्रियेसाठी अखेर तयार झाले. त्या सकाळी मी रुग्णालयात जात प्रचंड घाबरले होते. माझे हात-पाय भीतीने अक्षरशः थरथर कापत होते. तेव्हा माझ्या मुलाने मला धीर दिला आणि मला ऑपरेशन रूममध्ये नेले. जिथे मी माझ्या मेडिकल टीमसमोर आत्मसमर्पित झाले होते.”, असंही त्या या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
हे देखील वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे-विकी जैननंतर नील-ऐश्वर्यामध्ये जोरदार भांडण, एकमेकांच्या अंगावर आले अन्…
“एका तासानंतर मी तिथून बाहेर निघाली, तेव्हा माझ्या डोळ्यांना पट्टी बांधलेल्या पण ठणठणीत अवस्थेत दिसत होती. माझ्या प्रकृतीत आता दिवसेंदिवस सुधारणा होत असून मला सांगण्यास आनंद होतं की, माझी दृष्टी पहिल्यापेक्षा अधिक स्पष्ट दिसत आहे.”, असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून कलाकारांसह चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.