बॉलिवूड अभिनेता अरबाज खान हा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. गेले काही दिवस त्याच्या नवीन लग्नाबाबतच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगटणा पाहायला मिळत होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. अरबाजने नुकतंच मेकअप आर्टिस्ट शूरा खानबरोबर लग्न केले आहे. रविवार, २४ डिसेंबर रोजी अर्पिता खानच्या घरी या दोघांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर जवळपास ६ वर्षांनी अरबाजने शुरा खानबरोबर त्याचा दूसरा संसार थाटला आहे. (Arbaaz Khan On Instagram)
अरबाज व शुरा खान यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली होती. तसेच या लग्नसोहळ्याला त्याचे जवळचे कुटुंबीय व मोजकांच मित्रपरिवार उपस्थित होता. अरबाज-शुरा यांचा हा विवाहसोहळा पार पडताच अरबाजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. अरबाज व शूरा यांचा हा फोटोवर चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळींनी लाईक्स व कमेंट्स करत तुफान प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – मॉडर्न अंदाजात थिरकले गौतमी-स्वानंद, संगीत सोहळ्यामधील व्हिडीओ आला समोर, पाहा खास क्षण
अरबाजने लग्नात खास पोशाख परिधान केला होता. त्याने फुलांच्या डिझाईन असलेला शर्ट व त्यावर सोनेरी रंगाची पॅंट परिधान केली होती तर, शुरानेही अरबाजच्या कपड्यांना साजेसा असा पेस्टल रंगाचा गुलाबी लेहेंगा व त्यावर सोनरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. त्याचबरोबर डोक्यावर मॅचिंग स्कार्फही घेतला होता. तसेच या फोटोंमध्ये तिने तिच्या कपड्यांना साजेसा मेकअप व दगिन्यांचा साजशृंगारही केल्याचे दिसून आले.
अरबाजने त्याची दुसरी पत्नी शूरा खानबरोबरच्या लग्नातील फोटो शेअर केले असून या फोटोखाली त्याने असे म्हटले आहे की, “आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत, मी व माझी मैत्रीण आजपासून कायमचे एकत्र झालो आहोत. या खास दिवशी मिळालेल्या तुमच्या प्रेम व आशीर्वादासाठी धन्यवाद.” दरम्यान, या फोटोखाली नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे या नवदाम्पत्याला शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत.