Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage : सिनेसृष्टीतील लोकप्रिय कुटुंब देशपांडे कुटुंबियांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत असताना अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. काही वेळातच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. दोन दिवसापासून गौतमी व स्वानंद यांच्या लग्नाआधीच्या विधींचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. अखेर आज ही जोडी लगीनगाठ बांधताना दिसणार आहे.
गौतमीने स्वानंद बरोबरच्या नात्याचा याआधी कधीच खुलासा केला नव्हता. दरम्यान, प्रेक्षकांमध्ये मात्र गौतमी व स्वानंद यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे हिने बहिणीच्या लग्नाची तयारी करतानाचे व्हिडीओ शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गौतमीने तिच्या मेहंदी सोहळ्यानिमित्त नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत पहिल्यांदाच तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली.
आणखी वाचा – मॉडर्न अंदाजात थिरकले गौतमी-स्वानंद, संगीत सोहळ्यामधील व्हिडीओ आला समोर, पाहा खास क्षण
गौतमी व स्वानंदच्या मेहंदी, हळदी समारंभाचे अनेक फोटो समोर आले. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक व कलाक्षेत्रातील मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांच्या हळदीचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. अखेर आता गौतमी व स्वानंद विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच गौतमी-स्वानंदच्या लग्नाच्या सजलेल्या मंडपाचा फोटो समोर आला आहे. निसर्गरम्य वातावरणात अगदी शाही थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाहसोहळा उरकणार आहे. वाईल्डरनेस्ट रिसॉर्ट, खडकवासला येथे गौतमी व स्वानंदच लग्न होणार आहे.
आणखी वाचा – म्हावऱ्याचा बेत अन् शाकाहारी मेजवानी; मुक्ता-सागरच्या केळवणाची अलिबागमध्ये जय्यत तयारी
गौतमी-स्वानंदच्या हळदी समारंभाने तसेच त्यांच्या संगीत सेरेमनीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. संगीत सोहळ्यासाठी गौतमी व स्वानंदचा खास लूक विशेष भावला. गौतमीने पांढऱ्या रंगाचा गाऊन, व स्वानंदने फॉर्मल कपड्यांवर ब्लेझर परिधान केलं होत. दोघांचा रोमँटिक डान्सही साऱ्यांच्या पसंतीस पडला. गौतमी- स्वानंदच्या संगीत व हळदी सोहळ्यात मृण्मयीचा डान्सही हवा करून गेला.