Dwayne Johnson Controversy : हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसन त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. काही काळापूर्वी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. जेव्हा त्याच्यावर रेड वनच्या सेटवर उशिरा पोहोचल्याचा आरोप करण्यात आला होता. इतकंच नव्हे तर सेटवर वाईट वर्तन केल्याचा आरोपही अभिनेत्यावर करण्यात आला होता. आता ड्वेनने या आरोपांवर आपले मौन सोडले आहे. एका मुलाखतीत त्यांनी याबाबत चर्चा केली आहे. त्यांची ही मुलाखत चांगलीच व्हायरल होत आहे. GQ ला दिलेल्या मुलाखतीत ड्वेन जॉनसनने कबूल केले की, तो बाटलीत लघवी करायचा आणि सेटवर उशीरा यायचा, पण लोकांनी सांगितले इतकेही यांत तथ्य नाही.
ड्वेनने मुलाखतीत सांगितले, “मी काम करताना बाटलीत लघवी करतो”. अभिनेता पुढे म्हणाला, “होय, असे होते”. जेव्हा त्याला सेटवर उशीर होण्याबद्दल विचारले गेले, ज्यामुळे प्रॉडक्शनचे बरेच पैसे बुडाले, तेव्हा त्याने कबूल केले, होय, असे देखील होते. मात्र, सेटवर ८ तास उशिरा पोहोचल्याचे अभिनेत्याने नाकारले. अभिनेता म्हणाला, “पण तसा उशीर झालेला नव्हता”. तसेच हा संपूर्ण वाद मूर्खपणाचा असल्याचे त्याने म्हटले आहे.उत्तरदायित्व घेण्यावर आपला विश्वास आहे, असे सांगून तो म्हणाला.
आणखी वाचा – अरबाज-निक्कीनंतर छोटा पुढारी जान्हवी किल्लेकरच्या भेटीला, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “दाजींनी मला…”
हा वाद मूर्खपणाचा असल्याचं त्याने सांगितलं. “मी अनेकवेळा म्हटलं आहे, जे काही असेल तर मला विचारा, मी तुम्हाला सत्य सांगेन”, असंही तो म्हणाला. रेड वनचे दिग्दर्शक जेक कासदानने प्रकाशनाला सांगितले की, “ड्वेनने कामाचा एकही दिवस चुकवला नाही”. तो पुढे म्हणाला की, “तो कधीकधी उशिरा यायचा, परंतु ते हॉलीवूड आहे. इथे असं सर्वांबरोबर घडते”. त्याने असेही सांगितले की, “अभिनेत्याचे बरेच काही चालू आहे आणि त्याने त्याला सेटवर सर्वांशी गैरवर्तन करताना पाहिले नाही”.