‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व गाजले ते म्हणजे मैत्रीमुळे. ‘बिग बॉस’च्या घरात अनेकांची एकमेकांशी वाद झाले पण घरातील स्पर्धकांनी त्यांची मैत्री कायमच जपली. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपल्यानंतर घरातील सर्वच स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेत आहेत. गेल्या काही दिवसांत इरीना व वैभव ही डीपी यांच्या गावी गेल्याचे पाहायला मिळाले. तसंच डीपी, वैभव, इरीना ही तिघे सूरजच्या गावी गेले होते. अशातच छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडेने निक्की व अरबाज यांची भेट घेतली. निक्की व अरबाज यांच्या भेटीसाठी घन:श्याम खास मुंबईत आला आहे. या भेटीचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Ghanshyam Darwade Janhavi Killekar Meet)
अरबाज-निक्कीनंतर घन:श्यामने नुकतीच जान्हवी किल्लेकरचीदेखील भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओही घन:श्यामने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “आपल्याबरोबर आहेत ‘बिग बॉस’च्या टास्कक्वीन जान्हवी किल्लेकर. त्या माझ्या भाऊबीजेला आल्या नव्हत्या, पण मी त्यांना भेटायला आलो आहे. आमच्या दाजींनी आग्रह केला म्हणून मी आलो आहे”. यानंतर घन:श्याम जान्हवीला “कशा आहेत जान्हवी मॅम? असं विचारतो. यावर जान्हवी त्याला असं म्हणते की, “मी छान आहे. तुम्ही कसे आहात घन:श्याम सर?”. यापुढे घन:श्याम असं म्हणतो की, हिच्या या बोलण्यावर जाऊ नका. मी केवळ दाजींनी बोलावलं आहे म्हणून इथे आलो आहे. यावर जान्हवी त्याला असं म्हणते की, “जेवणही दाजींनीच केलं ना? याच्यासाठी मी इतकं स्वादिष्ट जेवण केलं पण याला त्याची काही किंमतच नाही”.
आणखी वाचा – ‘राजा राणीची गं जोडी’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
यावर घन:श्याम असं म्हणतो की, “मला सगळ्याच बहिणी म्हणतात की, मला किंमत नाही.” पुढे जान्हवी असं म्हणते की, “नाहीच आहे तुला किंमत. सगळ्यांना सांग मी किती स्वादिष्ट जेवण बनवलं होतं ते…” ढे घन:श्याम मस्करी करत असं म्हणतो की, “आमच्या जान्हवीताईच्या सासूबाईंनी एक नंबर जेवण बनवलं होतं” आणि यावर जान्हवी त्याला हसत हसत फालतू असं म्हणते. पुढे घन:श्याम तिचे कौतुक करत असं म्हणतो की, “आमची जान्हवीताई अन्नपूर्णा आहे. ती खरच खूप छान जेवण बनवते”. यानंतर जान्हवी पुन्हा त्याला असं म्हणते की, “तू खरंच कधीच सुधरणार नाहीस वाटतं. हे बिग बॉसचं घर नाही. आता आपण बाहेर आलो आहोत. आता टोमणे मारणं बंद कर.” पुढे घन:श्याम तिला असं म्हणतो की, “हे बिग बॉसचे घर नाही आणि हे जान्हवीचंही घर नाही. हे आमच्या दाजींचं घर आहे”.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. यापैकी एका गटात निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी आणि घन:श्याम एकत्र खेळत होते. कालांतराने या ‘टीम ए’मध्ये फूट पडली आणि जान्हवी व वैभव यांनी हा ग्रुप सोडला. घन:श्याम व जान्हवी यांच्यातही अनेक वाद झाले. पण असं असलं तरी घन:श्यामने घराबाहेर आपली मैत्री जपली आहे.