Akshay kumar look : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमी चर्चेत असतो. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळते. या वर्षी त्यांचे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते मात्र या चित्रपटांना हवे तितके यश मिळू शकले नाही. आता त्याचा एक नवीन चित्रपट ‘खेल खेल मे’ १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांचेच लक्ष त्याकडे लागले आह. मात्र तो आता त्याच्या चित्रपट किंवा अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शिका व नृत्य दिग्दर्शिका फराह खानच्या आईचे निधन झाले होते. बॉलिवूडमधील सर्व कलाकार फराहच्या घरी सांत्वन करण्यासाठी उपस्थित राहिलेले दिसून आले होते. अशातच आता खिलाडी अक्षय कुमारने देखील हजेरी लावली आहे. यावेळी दिसलेल्या त्याच्या लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अक्षय साजिदबरोबर त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. अक्षयचा चेहरा बघून प्रेक्षकांना धक्काच बसला आहे. त्याची पांढरी दाढी असून तो खूप म्हाताऱ्यासारखा दिसत आहे. त्याचे लक्ष कॅमेराकडे जाताच त्याचे हास्य गायब झाले व तो निराश झालेला दिसला.
त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्याच्या करिअरला उतरती कळा लागलेली दिसत आहे. ‘बच्चन पांडे’, रक्षा बंधन’, ‘रामसेतू’, ‘सेल्फी’, ‘मिशन रानीगंज’, ‘बडे मिया छोटे मिया’ व ‘सरफिरा’ हे चित्रपट बॉक्सऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत.
१९८७ साली त्याने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मोहरा’, ‘मै खिलाडी तू अनाडी’, ‘जानी दुश्मन’, ‘गरम मसाला’, ‘फिर हेरा फेरी’, ‘हमको दिवना कर गये’, ‘भागम भाग’, ‘वेलकम’, ‘भूलभुलय्या’, ‘हे बेबी’, ‘सिंह इज किंग’, ‘हॉलिडे’, ‘पॅडमॅन’ व ‘सूर्यवंशी’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. आता तो ‘स्काय फोर्स’, ‘कनप्पा’, ‘जॉली एलएलबी ३, ‘वेलकम टू द जंगल’, ‘शंकरा’ व ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.