शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हनिमूनवरुन घरी परतले अधिपती-अक्षरा, भूवनेश्वरीला घराबाहेर काढल्याचे सत्य समजताच वडिलांची कॉलर पकडली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 2, 2024 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada adhipati akshara marathi serial new promo

चारुहासने भूवनेश्वरीला घराबाहेर काढल्याचे सत्य अधिपतीला समजणार, बाप-लेकाच्या नात्याला वेगळं वळण

Tula Shikvin Changlach Dhada : झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.  ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. मालिकेत रोज एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे मालिका आणखीनच रंजक होत चालली आहे. अक्षरा व अधिपतीच्या सुखी संसारात विघ्न आणण्यासाठी भुवनेश्वरी कायम नवनवीन डाव रचत असते. या दोघांनाही घराबाहेर काढून भुवनेश्वरीने त्यांची परीक्षादेखील घेतली. नुकतेच मालिकेत एक नवीन वळण आले ते म्हणजे चारुहासने भुवनेश्वरीला घराबाहेर काढलं. (Tula Shikvin Changlach Dhada New Promo)

अधिपती-अक्षरा थायलंडमध्ये हनिमून एन्जॉय करत असताना चारुहासने भुवनेश्वरीला घराबाहेर काढलं. मालिकेत सध्या आता  त्यांच्या हनिमूनचे कथानक पाहायला मिळत आहे. या कथानकाला प्रेक्षकांकडून चांगला  प्रतिसादही मिळत आहे. अशातच या मालिकेत लवकरच एक नवीन ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे अधिपती-अक्षरा परदेशातून पुन्हा परतले आहेत आणि चारुहासने भुवनेश्वरीलं घराबाहेर काढल्याचे अधिपतीला कळलं आहे. झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या नवीन ट्विस्टचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये अधिपती-अक्षरा घरी येताच अधिपतीलं भुवनेश्वरीला शोधत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : चक्क भांडी घासायचा कोकण हार्टेड गर्लला ट्रॉमा, ढसाढसा रडलीही अन्…; कसा निभाव लागणार?

“आईसाहेब घरात दिसत का नाहीत?” हे विचारतो. यावर त्याला चारुहासने आपल्या आईला घराबाहेर काढलं असल्याचं कळतं. त्यामुळे  आईला घराबाहेर काढल्याचा राग येऊन अधिपती वडिलांच्या अंगावर धावून जातो. अधिपती चारुहासचा गळा पकडत “तुमची हिंमत कशी झाली?” असा थेट प्रश्न विचारतो. मात्र या दोघांमध्ये अक्षरा येते आणि अधिपतीला अडवते. त्यामुळे आता अधिपतीमुळे भुवनेश्वरी पुन्हा घरी परतणार का?, बाप-लेकाच्या नात्यात आणखी दुरावा येणार का? की अक्षरा या दोघांचे नाते पुन्हा एकदा सुधारण्यास मदत करणार? हे आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनेच फसवलं, दुसऱ्याच मुलीबरोबर पकडलं अन्…; म्हणाली, “माझ्या आयुष्यामध्ये…”

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा असतो. तर, अक्षरा ही एका शाळेत शिक्षिका असते. त्यामुळे अधिपती तिला प्रेमाने ‘मास्तरीण बाई’ अशी हाक मारत असतो. त्याचं अक्षरावर मनापासून प्रेम असतं. सुरुवातीला या दोघांचं मनाविरुद्ध लग्न होतं. पण, आता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भागात अक्षराने अधिपतीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली.

Tags: marathi entertainment newsmarathi serialtula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Bigg Boss Marathi riteish deshmukh charges fee amount

Bigg Boss Marathi शोचं सूत्रसंचालन करण्यासाठी किती पैसे घेतो रितेश देशमुख?, एका एपिसोडचं मानधन तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.