शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलग फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारची झाली आहे अशी अवस्था, पांढरी दाढी अन् बदलता लूक पाहून सगळेच अवाक् कारण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 2, 2024 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
akshay kumar look

अक्षय कुमारच्या लूकने वेधलं लक्ष

Akshay kumar look : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमी चर्चेत असतो. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळते. या वर्षी त्यांचे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते मात्र या चित्रपटांना हवे तितके यश मिळू शकले नाही. आता त्याचा एक नवीन चित्रपट ‘खेल खेल मे’ १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांचेच लक्ष त्याकडे लागले आह. मात्र तो आता त्याच्या चित्रपट किंवा अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शिका व नृत्य दिग्दर्शिका फराह खानच्या आईचे निधन झाले होते. बॉलिवूडमधील सर्व कलाकार फराहच्या घरी सांत्वन करण्यासाठी उपस्थित राहिलेले दिसून आले होते. अशातच आता खिलाडी अक्षय कुमारने देखील हजेरी लावली आहे. यावेळी दिसलेल्या त्याच्या लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अक्षय साजिदबरोबर त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. अक्षयचा चेहरा बघून प्रेक्षकांना धक्काच बसला आहे. त्याची पांढरी दाढी असून तो खूप म्हाताऱ्यासारखा दिसत आहे. त्याचे लक्ष कॅमेराकडे जाताच त्याचे हास्य गायब झाले व तो निराश झालेला दिसला.  

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : चक्क भांडी घासायचा कोकण हार्टेड गर्लला ट्रॉमा, ढसाढसा रडलीही अन्…; कसा निभाव लागणार?

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्याच्या  करिअरला उतरती कळा लागलेली दिसत आहे. ‘बच्चन पांडे’, रक्षा बंधन’, ‘रामसेतू’, ‘सेल्फी’, ‘मिशन रानीगंज’, ‘बडे मिया छोटे मिया’ व ‘सरफिरा’ हे चित्रपट बॉक्सऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “माकडचाळे व खोटं वागणारे…”, सूरज, धनंजय व घन:श्यामसाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “सभ्य-असभ्यता…”

१९८७ साली त्याने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मोहरा’, ‘मै खिलाडी तू अनाडी’, ‘जानी दुश्मन’, ‘गरम मसाला’, ‘फिर हेरा फेरी’, ‘हमको दिवना कर गये’, ‘भागम भाग’, ‘वेलकम’, ‘भूलभुलय्या’, ‘हे बेबी’, ‘सिंह इज किंग’, ‘हॉलिडे’, ‘पॅडमॅन’ व ‘सूर्यवंशी’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. आता तो ‘स्काय फोर्स’, ‘कनप्पा’, ‘जॉली एलएलबी ३, ‘वेलकम टू द जंगल’, ‘शंकरा’ व ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.

Tags: akshay kumarviral videowhite beard
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada adhipati akshara marathi serial new promo

हनिमूनवरुन घरी परतले अधिपती-अक्षरा, भूवनेश्वरीला घराबाहेर काढल्याचे सत्य समजताच वडिलांची कॉलर पकडली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.