बॉलीवूड अभिनेता अजय देवगण हा त्याच्या अभिनयामुळे सतत चर्चेत असतो. त्याचा गंभीर अभिनयाने त्याने अनेक भूमिका अगदी सहजतेने केल्या आहेत. १९९१ साली त्याने ‘फूल और काटे’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने अनेक दमदार भूमिकाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. २०१० साली आलेल्या ‘सिंघम’ममधील त्याच्या भूमिकेने तर सर्वच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. पण आता तो त्याच्या आगामी चित्रपटामुळे अधिक चर्चेत आला आहे. (ajay devgan Maidaan trailer)
आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा ‘मैदान’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. खूप कालावधीपासून त्याचे चाहते या चित्रपटाची वाट बघत होते. या चित्रपटाची गोष्ट १९५२ ते १९६२ च्या दरम्यानची आहे. यामध्ये अजय भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारताना दिसत आहे.
#Maidaan mein utrenge Gyarah par dikhenge Ek.
— Ajay Devgn (@ajaydevgn) March 30, 2023
A True Story. Teaser out now – https://t.co/PtfoWIEIJ8#MaidaanTeaser #MaidaanOnJune23#PriyamaniRaj @raogajraj @iAmitRSharma @arrahman pic.twitter.com/1qJ7MOSe57
अजयने स्वतः सोशल मीडिया X वर ट्रेलर शेअर केला आहे. हा शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “एक हृदय, एक समज,एक विचार, एस.ए. रहीम व त्यांचा भारतीय संघाची न समोर आलेली खरी गोष्ट तुम्हीही जाणून घ्या. या ‘मैदाना’त १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात”, असे लिहिले आहे. अजयचा हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक व भारतीय राष्ट्रीय फुटबॉल टीमचे अब्दुल रहीम हे पेशाने शिक्षकदेखील होते. ते जेव्हा भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते तेव्हाचा काळ हा भारतीय संघासाठी सुवर्णकाळ होता. या चित्रपटामध्ये भारतीय संघ जिंकेल अशी खात्री आहे पण ती इतर कोणालाही नसते. त्यामुळे चांगला संघ तयार करण्यासाठी ते चांगल्या खेळाडूंना एकत्रित करण्यासाठी मेहनत घेताना दिसतात. त्यांना फुटबॉल व मैदानाव्यतिरिक्त काहीही दिसत नाही.
‘मुझे लगा था आज हिंदुस्थान की बात होगी,लेकिन हम तो अबतक बंगाल व हैद्राबादमध्येच अडकलो आहोत’, असे अजयचे संवाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये फुटबॉल संघाच्या निवडीवरही प्रश्न उभे राहिले, ज्यामध्ये अजय उत्तर देतो की, “जो समझमी नही आता उसपे बात नही करणी चाहीए”, असे संवाद देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
हा चित्रपट १० एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये अजयबरोबर अभिनेत्री प्रियमणी व गजराज राव देखील महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहेत. तसेच बोनी कपूर या चित्रपटाचे निर्माते असून अमित शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.