९०च्या दशकामध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. सहजसुंदर अभिनय, विनोदाचे अचूक टायमिंग, नृत्याच्या भन्नाट स्टेप यासाठी गोविंदा खूप प्रसिद्ध आहे. नुकत्याच एका डान्स रिअलिटी शोमध्ये त्याचे व त्याची पत्नी सुनीता पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अशातच तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला एकदा सह-अभिनेत्री आवडली असून तिच्याबरोबर तो एका हॉटेलमध्येही पकडला गेला होता. जाणून घेऊया नक्की तो किस्सा काय होता. (govinda affair with an actress )
गोविंदा त्याच्या अभिनय व नृत्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. पण खासगी आयुष्यामुळे तो नेहमीच वादात राहिला. अशातच आता त्याच्या अभिनेत्रीबद्दलचा एक किस्सा समोर आला आहे. ‘हद कर दी आपने’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनतेरी रानी मुखर्जी व गोविंदा हे एकत्रित आले होते. त्यावेळी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. या चित्रपटाचे चित्रिकरण स्वित्झर्लंड व अमेरिकेमधील काही ठिकाणी झाले होते. त्याचवेळी दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. चित्रीकरणावरुन परतल्यानंतरही ते एकमेकांना भेटत असत.
दोघांच्याही लपून छपून एकमेकांना भेटत. अशातच एका माध्यमातून रानी व गोविंदा एकदा एका हॉटेलमधील रुममध्ये पकडले गेले होते. जेव्हा या बद्दल गोविंदाची पत्नी सुनीताला समजलं तेव्हा मात्र त्याचे वैवाहीक आयुष्य धोक्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार हे जेव्हा सुनीताला समजलं तेव्हा ती आपल्या माहेरी निघून गेली होती.
या सर्व प्रकारानंतर गोविंदाने आपले लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. काही कालावधीनंतर सुनीता पुन्हा आपल्या घरी परतली. त्यानंतर मात्र गोविंदाच्या एकाही अफेअरची चर्चा झाली नाही. गोविंदा व सुनीता सध्या आपल्या वैवाहीक आयुष्यात खूप खुश आहेत.
गोविंदाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २०१९ साली तो ‘रंगीला राजा’ या चित्रपटामध्ये दुहेरी भूमिकेत दिसून आला होता. सध्या तो अभिनयापासून लांब असून लवकरच चित्रपटांमध्ये दिसून येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.