शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आयुष्यातील अडचणींमध्ये अडकलो आहे आणि…”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान असं का बोलला अभिषेक बच्चन?, म्हणाला, “काही कलाकार…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 14, 2024 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Abhishek Bachchan says he is caught up in life problems amid divorce talks with Aishwarya Rai

चर्चांदरम्यान आयुष्यातील अडचणींमध्ये अडकलो आहे ऐश्वर्या रायबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्याम अभिषेक बच्चनचं वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. हे वृत्त खोटे निघावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, सोशल मीडियावर सतत काही ना काही येत राहते, त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत येते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याचे नाव अभिनेत्री निम्रत कौरबरोबरही जोडले गेले होते. त्यामुळे अभिषेक व निम्रतच्या नात्याबद्दलच्या अनेक चर्चाही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अशातच आता या प्रकरणी अभिषेक बच्चनने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऐश्वर्या बच्चनबरोबरच्या घटस्फोटाच्या अफवांमध्ये ‘आयुष्याच्या गोंधळात अडकल्या’चे म्हटलं आहे.

अभिषेक बच्चन शुजित सरकारच्या आगामी ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाची तयारी करत आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक’च्या संगीत अनावरण सोहळ्यात अभिषेक बच्चनने आगामी चित्रपटात शुजित सरकारसोबत काम केल्यानंतर त्याच्या सर्वात मोठ्या यशाबद्दल सांगितले. यावेळी अभिषेक म्हणाला की, “मला आशा आहे की तुम्ही सर्वजण तुमच्या आयुष्यात काहीतरी नातं जोडू शकाल. आपण सगळेच जीवनाच्या चक्रव्यूहात अडकलो आहोत, आपल्याला पाहिजे ते करत आहोत. आपल्यापैकी काहीना नोकऱ्या मिळाल्या आहेत, आपल्यात काही कलाकार आहेत आणि जीवन हे तुम्हाला नेहमीच काय करावे आणि कसे करावे हे सांगत असतं”.

View this post on Instagram

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

आणखी वाचा – सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीवर जीवघेणा हल्ला, हात फ्रॅक्चर, म्हणाली, “खूप वेदना…”

तसंच यावेळी चित्रपटात काम करताना “तुला काय शिकायला मिळालं?”, असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिषेक आधी मस्करीत म्हणाला, “पुन्हा कधीच चित्रपटासाठी वजन वाढवू नका. खरंच, या वयात पुन्हा वजन कमी करणं खूप कठीण होतं.” यानंतर तो पुढे म्हणतो, “हा चित्रपट तुम्हाला या गोष्टीचं आश्वासन देईल की आयुष्यात प्रत्येकासाठी एक छोटीशी जागा असते. यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही साधर्म्य आढळेल अशी माझी अपेक्षा आहे”.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada : एकीकडे चारुलताचे लग्न, दुसरीकडे अक्षरा संकटात, अधिपती वाचवणार का?

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांत अभिषेकचे ‘मनमर्जियाँ’ आणि ‘घूमर हे त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. याशिवाय ‘द बिग बुल’, ‘ल्युडो’, ‘बॉब बिस्वास’ आणि ‘दसवी’ हे त्याचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. अभिषेक लवकरच शाहरुख खान आणि सुहाना खान यांच्यासोबत सुजॉय घोषच्या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय त्याचा ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: abhishek bachchanAISHWARYA RAIbollywood news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aishwarya Narkar

Video : ऐश्वर्या नारकर नक्की कसं आयुष्य जगतात?, व्हिडीओ शेअर करत सांगितलं संपूर्ण दिवसाचं शेड्युल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.