झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी चारुलताची एन्ट्री झाली आहे. चारुलताच्या एन्ट्रीनंतर मालिकेला एक नवीन वळण आलं आहे. अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. चारुहास-अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. एका अपघातात अधिपतीची खरी आई चारुलताचे निधन झाले आहे, असे कुटुंबातील सर्व जण समजतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात भुवनेश्वरी येते, जी चारुलतासारखी दिसते. आता चारुहासने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर चारुलता अक्षराला सापडते. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Updates)
चारुहास आणि चारुलता यांच्यातील नाते पूर्वीसारखे व्हावे यासाठी अक्षरा त्यांचे पुन्हा एकदा लग्नदेखील करण्याची तयारी करीत असल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी अक्षराला चारुलताच भुवनेश्वरी असल्याचे वाटले. त्यानंतर तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर तिला वेडी ठरविण्यात आले. बुधवारच्या भागात अक्षरा अधिपतीला घेऊन पोलिस स्थानकात बजरंगला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी तिने बजरंगला रस्त्यावर भुवनेश्वरीबरोबर बघितल्याचे अधिपती व पोलिसांना सांगते. मात्र पोलिस तिला बजरंग जेलमध्येच असल्याचे सांगतात.
बुधवारच्या भागात अक्षराला वेड लागल्याचे समजत हॉस्पिटलमधून काही नर्स तिला घेऊन जायला येतात. अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात अक्षरावर संकट आल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षरा हॉस्पिटलमध्ये असताना तिला अधिपती फोन करतात. तेव्हा बजरंग तिच्या खोलीमध्ये येतो. यादरम्यान, अक्षरा त्याच्यापासून वाचण्यासाठी आरडाओरडा करत असते आणि नर्सच्या फोनवर अधिपती तिचे ओरडणे ऐकतो.
आणखी वाचा – सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीवर जीवघेणा हल्ला, हात फ्रॅक्चर, म्हणाली, “खूप वेदना…”
अक्षराचे किंचाळणे ऐकून अधिपतीला काहीतरी गडबड असल्याचे जाणवते आणि तो धावत धावत हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. त्यामुळे आता संकटात पडलेल्या अक्षराला अधिपती वाचवू शकणार का? बजरंगपासून अक्षरा स्वत:चा बचाव करणार का? अक्षरा संकटात असताना चारुलता तिचा डाव साधणार का? हे मालिकेच्या आगामी भगातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.