बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. हे वृत्त खोटे निघावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, सोशल मीडियावर सतत काही ना काही येत राहते, त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत येते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याचे नाव अभिनेत्री निम्रत कौरबरोबरही जोडले गेले होते. त्यामुळे अभिषेक व निम्रतच्या नात्याबद्दलच्या अनेक चर्चाही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अशातच आता या प्रकरणी अभिषेक बच्चनने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऐश्वर्या बच्चनबरोबरच्या घटस्फोटाच्या अफवांमध्ये ‘आयुष्याच्या गोंधळात अडकल्या’चे म्हटलं आहे.
अभिषेक बच्चन शुजित सरकारच्या आगामी ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाची तयारी करत आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक’च्या संगीत अनावरण सोहळ्यात अभिषेक बच्चनने आगामी चित्रपटात शुजित सरकारसोबत काम केल्यानंतर त्याच्या सर्वात मोठ्या यशाबद्दल सांगितले. यावेळी अभिषेक म्हणाला की, “मला आशा आहे की तुम्ही सर्वजण तुमच्या आयुष्यात काहीतरी नातं जोडू शकाल. आपण सगळेच जीवनाच्या चक्रव्यूहात अडकलो आहोत, आपल्याला पाहिजे ते करत आहोत. आपल्यापैकी काहीना नोकऱ्या मिळाल्या आहेत, आपल्यात काही कलाकार आहेत आणि जीवन हे तुम्हाला नेहमीच काय करावे आणि कसे करावे हे सांगत असतं”.
आणखी वाचा – सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीवर जीवघेणा हल्ला, हात फ्रॅक्चर, म्हणाली, “खूप वेदना…”
तसंच यावेळी चित्रपटात काम करताना “तुला काय शिकायला मिळालं?”, असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिषेक आधी मस्करीत म्हणाला, “पुन्हा कधीच चित्रपटासाठी वजन वाढवू नका. खरंच, या वयात पुन्हा वजन कमी करणं खूप कठीण होतं.” यानंतर तो पुढे म्हणतो, “हा चित्रपट तुम्हाला या गोष्टीचं आश्वासन देईल की आयुष्यात प्रत्येकासाठी एक छोटीशी जागा असते. यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही साधर्म्य आढळेल अशी माझी अपेक्षा आहे”.
आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada : एकीकडे चारुलताचे लग्न, दुसरीकडे अक्षरा संकटात, अधिपती वाचवणार का?
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांत अभिषेकचे ‘मनमर्जियाँ’ आणि ‘घूमर हे त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. याशिवाय ‘द बिग बुल’, ‘ल्युडो’, ‘बॉब बिस्वास’ आणि ‘दसवी’ हे त्याचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. अभिषेक लवकरच शाहरुख खान आणि सुहाना खान यांच्यासोबत सुजॉय घोषच्या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय त्याचा ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.