बॉलिवूडमधील अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय ही लोकप्रिय जोडी आहे. २००७ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. लग्नाआधी त्यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. दोघांच्याही जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. त्यांचे लग्न झाल्यानंतरही ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. त्यांना आराध्या नावाची एक मुलगीदेखील आहे. तिच्याबद्दलही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असते. मात्र आता दोघांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोघंही घटस्फोट घेऊ शकतात अशा चर्चादेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या. (Abhishek Bachchan on divorce rumors)
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या वेळी बच्चन कुटुंब व ऐश्वर्या यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याचे दिसून आले. यावेळी अभिषेक कुटुंबासह पोहोचला मात्र ऐश्वर्या आराध्याबरोबर वेगळी हजर झालेली दिसून आली. त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचेही म्हंटले गेले. त्यानंतर घटस्फोटाच्या संबंधित एका पोस्टला अभिषेकने लाइक केल्याने त्याबद्दल या सगळ्या चर्चांना पुष्टी मिळाली. मात्र आता या सगळ्या चर्चांवर अभिषेकने भाष्य केले आहे.
‘बॉलिवूड युके मीडिया’ बरोबर झालेल्या मुलाखतीमध्ये अभिषेकने लग्नाची अंगठी दाखवत घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. एक फोटो शेअर करत त्याने, “मी अजूनही विवाहित आहे. त्याबद्दल माझ्याकडे बोलायला काही नाही आहे. तुम्ही सर्वांनी सर्व गोष्टी वाढवून चढवून सांगितल्या आहेत. हे सगळं चुकीचं आहे. मला समजत आहे की तुम्ही हे सगळं का करत आहात ते. तुम्हाला काहीतरी गोष्टी हव्या असतात. ठीक आहे. आम्ही सेलिब्रिटी आहोत आम्हाला याचा स्वीकार करावा लागेल. याआधी जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो सगळा ठरवून केला आहे”.
या सगळ्या चर्चाच्या दरम्यान अभिषेक हा एकटाच पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी उपस्थित होता. त्याने भारताचे प्रतिनिधीतत्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. रौप्य पदक मिळवल्यानंतर त्याने नीरजला देखील मिठी मारली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, आता तो शाहरुख खान व सुहाना खान यांच्याबरोबर ‘किंग’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.