Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ सध्या सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वातील स्पर्धकांचे वाद, भांडण, अटीतटीचा सामना सारं पाहणं रंजक ठरत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवात झाली असून या आठवड्याची सुरुवातच भांडणाने झाली. रितेश देशमुखने दोन्ही आठवड्याच्या विकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची शाळा घेतलेली पाहायला मिळाली. स्पर्धकांच्या चुका दाखवत, त्यांना त्यांची जागा दाखवत रितेशने त्यांची कानउघडणी केली. अशातच नुकताच भाऊचा धक्का होऊन गेला.
यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर खास पाहुणे म्हणजे अक्षय कुमार आला होता. खेल खेल में या त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अक्षय त्याच्या संपूर्ण टीमसह ”बिग बॉस’मध्ये आला होता. यावेळी अक्षय कुमारने काही स्पर्धकांना हॅशटॅग देत तो स्पर्धक कोण आहे, कोण असावा याबाबत विचारणा केली. तेव्हा अभिजीत सावंतला खिलाडी हा हॅशटॅग कोणासाठी योग्य आहे, असं विचारण्यात आलं. यावर अभिजीतने उभं राहत खिलाडी हा हॅशटॅग निक्की तांबोळीसाठी योग्य आहे असं सांगितलं. निक्कीला हा खेळ समजला आहे आणि ती योग्य प्रकारे खेळत आहे. त्यामुळे खिलाडी हा हॅशटॅग मी त्याला देऊ इच्छितो असं सांगितलं.
अभिजीतने निक्कीच नाव घेताच अरबाजचा चेहरा पडलेला दिसला. अभिजीतने निक्कीच केलेलं कौतुक पाहून अरबाजचा चेहरा पडताच रितेश देशमुखने अरबाजला टोकलं. आता ‘बिग बॉस’च्या घरात दोन गट झालेले पाहायला मिळत आहेत. निक्कीच्या गटात अरबाज, वैभव, घनःश्याम, जान्हवी हे स्पर्धक पाहायला मिळतात. तर अभिजीत सावंतच्या गटात अंकिता वालावलकर, धनंजय, योगिता, निखिल दामले, पॅडी, वर्षा ही कलाकार मंडळी दिसत आहे.
अशातच आता अभिजीत सावंतने त्यांच्या गटातील कोणत्याच स्पर्धकाला खिलाडी हा हॅशटॅग न दिल्याने स्पर्धकांनी अभिजीतच्या निर्णयावर नाराजी दर्शविली आहे. धनंजय म्हणतो, “निक्कीला खिलाडी टॅग दिलं”. यावर अंकिता म्हणाली, “अभिजीतनेच दिलं. आपलंच नाणं खोटं आहे म्हटल्यावर काय बोलायचं”. यावर धनंजय म्हणतो, “त्याला तर डोक्याचा भाग हवा, आताच याच्यावरुन वाजलं. अंकिताला दे. आताच ती कॅप्टन झाली आहे तर ते कोणीही स्वीकारलं असतं”. यावर सूरज जाऊदे म्हणतो. तर अंकिता म्हणते “तो एक मोठा शो जिंकून आला आहे. त्यामुळे त्याच्या आत असुरक्षितता आहे ज्यामुळे त्याला हा खेळ जिंकून जायचा आहे”, असं म्हणत स्पर्धक अभिजीतच्या निर्णयाशी सहमत नसतात.