Tharala Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली अर्जुनवर तो खोटं बोलत असल्याने फार चिडते. शेवटी अर्जुनचासुद्धा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि सायलीला तो उलटसुलट बोलू लागतो. त्यामुळे सायली रडायला लागते. आणि रडत रडत सायली झोपून जाते. शांत झोप असं सांगत तुझी यापुढे समजूत काढणार नसल्याचे अर्जुन सायलीला सांगून झोपून जातो. सायली प्रतिमाला नाश्त्याला बाहेर बोलावते पण प्रतिमाचा काहीही प्रतिसाद नसल्याने शेवटी सायली नाश्ता आणून देत असल्याचे प्रतिमाला सांगते. तन्वी नाश्त्याला उशिरा येताच कल्पना तिला उशिरा उठण्याबद्दल विचारते पण तन्वी प्रतिमाच्या काळजीने झोप लागत नव्हती असं खोट कारण देते.
त्यावर रविराज व प्रताप तन्वीला समजावतात. सायलीकडे पाहूनही अर्जुन तिच्याकडे फारसे लक्ष देत नसल्याने अस्मिता दोघांमध्ये भांडण झाले असल्याची शक्यता बोलून दाखवते. अस्मिता लगेच सायलीला बोलू लागते इतक्यात कल्पना अस्मिताला बोलण्यापासून तिथेच थांबवते. तन्वी नागराजला फोन करुन रविराज कुठेतरी सकाळीचं गेल्याचे सांगते. सुनीता नर्सला फोन करुन, किल्लेदार हॉस्पिटल मध्ये आल्यास त्याच्यासमोर न जाण्याचे तिला सांगा, नाहीतर सर्व खरं कळेल आणि मग आपलं काही खरं नाही, असं तन्वी नागराजला सांगते. इथे सायली प्रतिमाला खोलीत नाश्ता आणून देते आणि तिला ठसका लागताच पाणीपण देते. बेसन लाडू व चिवडा करत असून खायला मध्येच बरे पडते असंही सायली प्रतिमाला सांगते. हे ऐकताच प्रतिमाला तिचे भूतकाळातले काम तिला अचानक आठवू लागते. प्रतिमा तिच्यापरीने सायलीला सांगून समजावायचा प्रयत्न करते पण कल्पना इतक्यात सायलीला हाक मारते. कल्पना सायलीला नाश्ता करुन घ्यायला सांगते. अर्जुन व चैतन्य ऑफिसला जायला निघताच सायली चैतन्य व अर्जुनला डबा देते.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारूमुळे अहिल्यादेवींनी खेळले मंगळागौरचे खेळ, दिशा-दामिनीला अद्दल घडविली अन्…
तसेच अर्जुनचा घसा खवखवत असल्याने त्याला वेगळे गरम पाणीसुद्धा देते. जाता जाता अर्जुन या जगात फेव्हरेट कॉफी तुझ्या हातचीच आहे असं सायलीला सांगतो. हे ऐकून सायलीचा अर्जुनवरचा राग निघून जातो. सायलीच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून अर्जुन राग गेल्याबद्दल समाधान व्यक्त करतो. दुसरीकडे नागराज हॉस्पिटलला पोहोचताच त्याला रविराज खोटा रिपोर्ट बनवणाऱ्या सुनीता नर्सशी बोलताना दिसतो. हे बघून नागराज चांगलाच घाबरतो. इथे घरी सायली लाडवासाठी बेसन भाजायला घेते. त्याचा अखंड सुगंध संपूर्ण घरभर पसरतो. त्याच सुगंधाने प्रतिमालासुद्धा बरं वाटतं. ती त्या सुवासाने खोलीबाहेर येताच सायली तिला किचनमध्ये येण्याची विनंती करते. पण प्रतिमा नको असं म्हणते.
आणखी वाचा – पॅडीचे कपडे फेकून दिले, अंकिताला जोरात बेडवर ढकललं आणि…; Bigg Boss Marathi च्या घरात निक्कीची दादागिरी
मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, प्रतिमा सायलीने करायला घेतलेले लाडू स्वतः वळायला घेते. हे बघून कल्पना व पूर्णा आईला खूप आनंद होतो पण त्यांना पाहून प्रतिमा अवघडल्यासारखी होत खोलीत निघून जाते. तो लाडू खाल्ल्यावर पूर्णा आईला प्रतिमाच्या हातची चव अजूनही कायम असल्याचे जाणवते. सायली कल्पना व पूर्णा आईला प्रतिमाच्या मोकळेपणासाठी स्वयंपाकघर हा उत्तम मार्ग असल्याचे सांगते.