बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटांमुळे अधिक चर्चेत आहे. नुकतीच अक्षयने ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान लखनऊ येथे सह-अभिनेता टायगर श्रॉफसह हजेरी लावली होती. पण त्यावेळी चाहत्यांनी केलेल्या गोंधळामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्यामुळे अक्षय व टायगरने कार्यक्रमामधूनच काढता पाय घेतला होता. पण अक्षय आता त्याच्या चित्रपटामुळे नाही, तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अक्षयने उदयपुर येथे एका मुलींच्या वसतीगृहाच्या कार्यक्रमावेळी हजेरी लावली होती. (Akshay kumar on Girls hostel)
अक्षय हा त्याच्या अभिनयाबरोबरच सामाजिक भान जपताना नेहमी दिसतो. त्याचाच प्रत्यय आता आला आहे. अक्षयने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून ब्रेक घेत उदयपुर येथील खेरवाडा छावणीमध्ये वनवासी कल्याण परिषदेच्या वसतीगृहाचा दौरा केला. तिथे त्याने पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा अक्षय तिथे पोहोचला तेव्हा आरती सुरू होती. त्याला पाहताच तेथील विद्यार्थी खूप खुश झाले. त्यानंतर अक्षयने विद्यार्थ्यांसह गप्पा मारल्या आणि मस्तीदेखील केली. याचदरम्यान, त्याने वसतीगृहाला १ कोटी रुपये दान देण्याची घोषणाही केली.
Video: @akshaykumar sir visited Vanvasi Kalyan Parishad, Kherwara in Udaipur. He also pledged to donate 1 cr INR for renovation of its building. pic.twitter.com/3f2YqWVFrD
— Akshay Kumar 24×7 (@Akkistaan) February 28, 2024
अक्षयने ज्या वसतीगृहाला भेट दिली त्या वसतीगृहाला त्याच्या वाडिलांचे नाव देण्यात आले आहे. या वसतीगृहाला ‘हरिओम वसतीगृह’ असे नाव देण्यात आले असून गेल्या वर्षी याच्या बांधकामासाठी अक्षयने मदतही केली होती. त्यानंतर हे नाव बदलून ‘राजस्थान वनवासी कल्याण परिषद हरीओम आश्रम वसतीगृह’ असे ठेवले गेले. यामध्येच अक्षयने १ कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली असून त्याच्या या कृतीमुळे सर्वत्र अक्षयचे कौतुक होत आहे.
अक्षय हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेता आहे. आतापर्यंत याने दमदार भूमिका करून त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. पण आता निवडणुकांच्या तोंडावर अक्षय लोकसभा निवडणुकांमध्ये सहभाग घेऊ शकतो आणि यासाठी त्याला भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू होती. परंतु यावर अक्षयने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.