शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघना एरंडेच्या वडिलांचे निधन, भावुक होत म्हणाली, “बाबा तुमची आठवण…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 28, 2024 | 7:08 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Meghana erande father sudhir death actress shared sad post on instagram

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघना एरंडेच्या वडिलांचे निधन, भावुक होत म्हणाली, “बाबा तुमची आठवण...”

मराठी कलाविश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री मेघना एरंडे हिला पितृशोक झाला आहे. मेघना एरंडे हिचे वडील सुधीर एरंडे यांचे काल संध्याकाळी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यात निधन झाले आहे. मेघनाने स्वत: एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. 

मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर  केला आहे आणि हा फोटो शेअर करत तिने एक पोस्टही लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मी अत्यंत जड अंतःकरणाने तुम्हा सर्वांना कळवू इच्छिते की, माझे वडील सुधीर एरंडे यांचे २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पुण्यात निधन झाले.” यापुढे तिने तिच्या बाबांबद्दलच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “माझे बाबा खरोखरच एक रत्न होते. ते एक अतिशय प्रेमळ व्यक्ती होते. तुझी खूप आठवण येईल बाबा. ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो! ओम शांती”.

View this post on Instagram

A post shared by Meghana Erande (@meghana_erande)

आणखी वाचा – अभिमानास्पद! महेश काळे यांच्या पत्नीची ‘ऑस्कर’पर्यंत झेप, पोस्ट शेअर करत म्हणाले “जिद्द, मेहनत अन्…”

मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्रीसह एक उत्तम डबिंग आर्टिस्ट म्हणूनही मेघना एरंडेला ओळखले जाते. मेघना एरंडेने हॅरी पॉटरच्या सीरिजपासून अगदी निंजा हातोडी, नॉडी यांसारख्या अनेक कार्टुनच्या पात्रांना आवाज दिला आहे. फार कमी वयात मेघनाने कलाविश्वात पदार्पण केलं आणि सिनेक्षेत्रात तिचे स्थान निर्माण केलं आहे आणि या साऱ्यात तिला तिच्या वडिलांचा खूपच मोठा आधार होता. अशातच तिचे पितृछत्र हरवल्यामुळे ती कोलमडून गेली आहे.  

आणखी वाचा – “पुरस्कार सोहळ्यांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्यांना मागे बसवतात अन्…”, सोनाली कुलकर्णीचा खुलासा म्हणाली, “मी उठून…”

दरम्यान, मेघनाच्या या पोस्टखाली अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत मेघनाच्या वडिलांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच अनेकांनी कमेंट्स करत त्यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे.  

Tags: मराठी अभिनेत्रीमेघना एरंडेमेघना एरंडे वडीलmarathi actressMeghana ErandeMeghna Erande's fatherMeghna Erande's father passed away
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Suruchi Adarkar Mangalsutra Design

तितीक्षा तावडेच्या लग्नात सुरुची अडारकरच्या मंगळसूत्राची चर्चा, काळ्या मण्यांचा कमी प्रमाणात वापर करत युनिक डिझाइनला पसंती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.