सध्या रंगभूमीवर अनेक नाटक दणक्यात सुरु आहेत.जुन्या नाटकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद येत आहे. तर नवीन नाटकांचं त्याच उत्साहाने स्वागत करत आहेत. करून गेलो गाव, नियम व अटी लागू, दादा एक गुड न्यूज आहे अशी अनेक नाटक सध्या सुरु आहेत. याच सोबत शाळकरी मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्या आहेत.आणि अशातच बोक्या सातबंडे हे बालनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. (Bokya Satbande Review)
जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या बोक्या सातबंडे या पुस्तकातील एका कथेवर आधारित हे नाटक आहे. योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत आरुष बेडेकर हा महत्वाच्या भुमीकेत पाहायला मिळाला होता.या नाटकात आरुष बोक्या ही भूमिका साकारत आहे.त्याच सोबत अनेक बालकलाकार या नाटकात आहेत. त्यांच्या अभिनयातील सहजता प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवते. अभिनयासोबतच, संगीत, नेपथ्य, आणि वेशभूषा हे या नाटकाचे विशेष आकर्षण आहे.
जाणून घ्या बोक्या सातबंडे नाटकाबद्दल (Bokya Satbande Review)
घरातील मोठी माणसं लहानांना अनेक गोष्टी शिकवत असतात. पण त्याच गोष्टी जेव्हा आपल्याच वयाची मुलं करताना लहान मुलं बघतात, तेव्हा त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी जास्त सोप्या पद्धतीने पोहचतात. बसून पाणी प्या, झाड लाव, प्लास्टिक वापरू नका, प्रांण्यांवर प्रेम करा, अशा अनेक गोष्टी लहान मुलांना शिकवण्याचं प्रयत्न या बालनाट्यातून केला गेला आहे. आपल्याच वयाचा बोक्या जेव्हा प्रत्येक परिस्थितून मार्ग काढतो हि गोष्ट मुलांमध्ये नकळत सकारत्मकता निर्माण करते. (Bokya Satbande Review)
हे देखील वाचा : रंगभूमी गाजवणाऱ्या ‘सफरचंद’ नाटकाचा आणखी एक विजय राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावत मारली बाजी
मुलं सध्या, मोबाईल, सोशल मीडिया, व्हिडिओ गेम यातच अडकून असतात. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवणं, गप्पा मारणं, मैदानी खेळ खेळणं या गोष्टी मागे पडत आहे. या मुद्यावर देखील भाष्य करण्यात आलं आहे. मनोरंजांसोबत प्रबोधन हा ताळमेळ या नाटकात चांगला राखला गेला आहे. त्यामुळे या सुट्ट्यांमध्ये हे नाटक मुलांसाठी कम्प्लिट समर ट्रीटच आहे, असं आपण नक्कीच म्हणून शकतो. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या लहानग्यानं सोबत बोक्या सातबंडे हे नाटक आवर्जून पाहावं.