स्टार प्रवाह वरील अनेक मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्व्ल स्थानावर आहेत.वेगवेगळे विषय, कथानक घेऊन या मालिका येत आहेत. आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.प्रत्येक मालिकेला प्रेक्षक देखील चांगला प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. (Urmila Kothare New Look)
त्यातीलच सध्या तुझेच मी गीत गात आहे ही मालिका,प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसते आहे. सुरवातीपासून या मालिकेत सस्पेन्स टिकवून ठेवला आहे. वैदेही, स्वरा आणि मल्हार या कुटुंबाची ही कहाणी आहे. परंतु वैदेहीच्या मृत्यूनंतर मालिकेचे प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षा ३६० डिग्री मध्येच बदलले.
पाहा उर्मिलाचा नवीन लुक (Urmila Kothare New Look)
सध्या ही मालिका पुन्हा झालेल्या उर्मिला कोठारेंच्या एंर्टी मुळे चर्चेत आहेत.मालिकेच्या सुरवातीला उर्मिला स्वराच्या आईची म्हणजेच वैदेहीची भुमीका साकारत होती, पंरतु कमी कालावधीत त्या पात्राने प्रेक्षकांचं निरोप घेतला. आणि काहीच दिवसांपूर्वी उर्मिलाने मालिकेत मंजुळा या भूमिकेत कमबॅक केले. आणि उर्मिलाचं मंजुळा हे पात्र चांगलंच चर्चेत आहे.
एक ट्विस्ट मालिकेत आला तो पर्यंत आता मंजुळाची नवीन लुक मालिकेत पाहायला मिळणार आहे.आणि मोनिका आणि मंजुळाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेतील उर्मिलाचा हा नवा लुक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मंजुळा आता मालिकेत नवं काय वळण आणणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. मालिकेचं कथानक सस्पेन्स टिकवून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.(Urmila Kothare New Look)
हे देखील वाचा : ‘या’ पाच कारणांसाठी बोक्या सातबंडे हे नाटक नक्की पाहा.