रंगभूमी गाजवणाऱ्या ‘सफरचंद’ नाटकाचा आणखी एक विजय राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावत मारली बाजी

Safarchand Marathi Drama
Safarchand Marathi Drama

मनोरंजन सृष्टीत सगळ्यात लोकप्रिय आणि जुनं माध्यम म्हणजे नाटक. अनेक विषयांवर भाष्य करणारी अनेक नाटकं रंगभूमीवर आली आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजना बरोबरच समाज प्रबोधन करण्याचं महत्वाचं काम ही या नाटकांमधून केलं जात. सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेलं असच एक नाटकं म्हणजे ‘सफरचंद’. अभिनेते शंतनू मोघे, अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या सह अन्य कलाकारांची दमदार भूमिका असलेलं नाटकं प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरलं आणि याचीच पोचपावती म्हणून या नाटकाने ३३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत प्रथम पारितोषिकासह बाजी मारली आहे.(Safarchand Marathi Drama)

मनोरंजनातून अंजन घालणारी आशयघन नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन रंगभूमीवर दाखल झालेली ‘सफरचंद’ ही नाट्य कलाकृती सध्या चांगलीच गाजतेय. लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी या सिद्धहस्त दिग्दर्शकानं या नाटकाचं निगदर्शन केलं आहे.

फिरता रंगमंच, नेत्रसुखद नेपथ्य, वातावरणाला साजेसं मधुर संगीत, यातून जबरदस्त नाट्यानुभव प्रेक्षकांना मिळतो आहे. खुर्चीला खिळवून टाकणारी परिणामकारकता आणि शंतनु मोघे, संजय जामखंडी, प्रमोद शेलार, शर्मिला शिंदें, अमीर तळवडेकर, रूपेश खरे, अक्षय वर्तक, राजआर्यन कासुर्डे या दमदार कलावंतांच्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर हे नाटक सध्या चर्चेचा विषय ठरतंय.

 (Safarchand Marathi Drama)

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे या पारितोषिकाची घोषणा केली आहे. या नाटकाला रुपये सात लाख पन्नास हजाराचा पुरस्कार मिळणार आहे. आतापर्यंत एकूण २१ पारितोषिक पटकवणाऱ्या सरगम आणि अमरदीप संस्थेच्या ‘सफरचंद’ या नाटकाने झी नाट्य गौरव, मटा सन्मान, माझा पुरस्कार, सांस्कृतिक कलादर्पण, महाराष्ट्र शासन अशा विविध व्यासपीठावर जोरदार बाजी मारली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील यश आमच्या संपूर्ण टीमसाठी आनंददायी असल्याची भावना निर्माता,दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.(Safarchand Marathi Drama)

 (Safarchand Marathi Drama)

‘सरगम’ आणि ‘अमरदीप’ निर्मित, ‘कल्पकला’ प्रकाशित, ‘सफरचंद’ या नाटकात एक वेगळा विषय मांडला असून ‘सर्वधर्मसमभाव’ हा चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या ‘सफरचंद’ नाटकाने सगळ्याच बाबतीत आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Sankarshan Karahade Bus Drive
Read More

“थांबेल तो संक्या कसला” ड्राइव्हर आजारी संकर्षणने चालवली बस गुरूंकडून होतंय कौतुक

सध्या रंगभूमीकडे प्रेक्षक पुन्हा एकदा वळताना दिसत आहेत आणि या मध्ये अनेक नाटकांचा कलाकारांचा वाटा आहे. रंगभूमी समृद्धी…
Prajakta Gaikwad South Movie
Read More

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं साऊथमध्ये पदार्पण? यासाठी सोडलं होतं महानाट्य? व्हिडिओ ठरतोय चर्चेचा विषय

अनेक कलाकार विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अनेक काम करून ही एखाद्या विशिष्ठ भूमिकेसाठी तो कलाकार ओळखला…
Dilip Joshi Struggle Story
Read More

“मनात अभिनय पण जबाबदारीसाठी बस ट्रॅव्हल्स मध्ये करत होते काम” वाचा कस बदललं जेठालालचं खरं आयुष्य

माणसू जन्मतः त्याच्या संघर्षाची कहाणी सुरु होत असते. भविष्यात त्याला किती ही संकटाना सामोरं जावं लागलं किंवा किती…
Bharat Jadhav Angry
Read More

‘या पुढे रत्नागिरीत पाय ठेवणार नाही’ नाटका दरम्यान गैरसोयीमुळे भडकले भरत जाधव

मंडळी मनोरंजनाचं पारंपरिक साधन असलेली रंगभूमी आज अनेक नवे जुने कलाकार आपल्या मेहनतीने बहारदार बनवत आहेत. विविध विषयांवर…
Prashant Damle President
Read More

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामलेंची सरशी

पंचवार्षिक अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. अध्यक्षपदासाठी अभिनेता प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी…
Struggle Story Yogesh Shirsat
Read More

‘रंगमंचावर मुलाचं कौतुक पाहिलं आणि वडिलांचा पॅरालिसिस झालेला डोळा बरा झाला’ योगेशने शेअर केला तो भावनिक किस्सा

एखादा कलाकार रंगमंचावर आपली भूमिका पार पडत असताना आपल्या पुढच्या पिढीलाही त्याच रंगभूमीवर अभिनय करताना पाहत असतो. मुलांबाबत…