‘मार्वल’च्या ‘ब्लॅक पँथर’ व ‘अव्हेंजर्स’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता तराजा रामसेसचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. ३१ ऑक्टोबर रोजी जॉर्जिया महामार्ग येथे ४१ वर्षीय तराजाचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच त्याच्या तीनही मुलांचाही यात मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची पिकअप ट्रक एका ट्रॅक्टरला धडकली. ज्यामुळे हा भीषण अपघात घडला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आईने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. (Black Panther fame actor and Stuntman dies due to road accident)
एका स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्जिया येथे राहणारा तराजा हॅलोवीनच्या रात्री मुलांनी भरलेला पिकअप ट्रक चालवत होता. त्यावेळी ती ट्रक एका ट्रॅक्टरला धडकली. ज्यात तराजा रामसेसचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच, या दुर्घटनेत त्याची १३ वर्षीय मुलगी सुंदरी, १० वर्षांचा मुलगा किससी आणि नवजात मुलगी फुजिबो यांचादेखील मृत्यू झाला. दरम्यान, अभिनेत्याबाबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. यावेळी तराजाची आई अयकीली रामसेस यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला.
हे देखील वाचा – ४० वर्षांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होत्या झीनत अमान, डोळ्यांवर झाली शस्त्रक्रिया, लूकही बदलला अन्…
या पोस्टमध्ये त्या असं म्हणाल्या, “माझा प्रेमळ आणि प्रतिभावान मुलगा तराजा रामसेस आणि त्याची दोन मुलं १३ वर्षीय सुंदरी आणि ८ आठवड्यांची नवजात फुजिबो यांचा भीषण ट्रक अपघातात मृत्यू झाला. तर माझा नातू १० वर्षीय किससी तो सध्या लाईफ सपोर्टवर आहे. मात्र माझी दोन नातवंडे यात वाचली असून तिसरी नातीही तिला किरकोळ दुखापतीतून बारी होत आहे.”, अशी माहिती देत त्यांनी तराजा व त्याच्या मुलांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, काही वेळातच पुढच्या पोस्टमध्ये त्यांनी तिसरा मुलगा किससीच्या मृत्यूचीही माहिती देताना म्हणाल्या, “आमचा किससी देखील त्याच्या वडील व बहिणींकडे गेला आहे.”
हे देखील वाचा – रश्मिका मंदानापाठोपाठ कतरिना कैफही डिपफेक व्हिडीओची शिकार, विचित्र कपडे परिधान केलेला अश्लील फोटो व्हायरल
तराजा रामसेसने ‘मार्वल’ सिरीजमधील अनेक चित्रपटांसाठी स्टंटमॅन म्हणून काम केलेलं आहे. ज्यात ‘ब्लॅक पँथर’, ‘अव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ व ‘अव्हेंजर्स : एंडगेम’ यान चित्रपटाचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने ‘द सुसाईड स्क्वॉड’, ‘द हंगर गेम्स: कॅचिंग फायर’, ‘एमेंसिपेशन’ या चित्रपटांमध्ये त्याने काम केलेलं आहे. तराजाच्या आकस्मिक निधनाने मार्वलच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.