सध्याचं मराठीमधील ‘बिग बॉस’चं पाचवं पर्व चांगलंच चर्चेत राहिलं आहे. यामध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकार, तसेच सोशल मीडिया इन्फ्लूएंसरदेखील सहभागी झाले होते. वर्षा उसगांवकर, आर्या जाधव, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, अरबाज पटेल, इरिना रुडाकोव्हा, वैभव असे अनेक जण सहभागी झाले होते. सूरज हा ‘बिग बॉस’चा विजेता ठरला. त्यानंतर त्याची भेट घेण्यासाठी अनेक स्पर्धक पोहोचले. सूरजच्या नवीन घरासाठी धनंजयने नवीन फर्निचर देणार असल्याचेही सांगितले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असलेले बघायला मिळतात. त्यांच्या व्हिडीओने सगळ्यांचेच मनोरंजन करताना ते दिसतात. अशातच आता त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. (dhananjay powar viral video)
धनंजय हे नेहमी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असलेले बघायला मिळतात. व्हिडीओच्या माध्यामातून ते नेहमी चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतात. अशातच आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये धनंजय व त्याचा मित्र दिसून येत आहे. यामध्ये दोघंही चाहत्यांशी इंग्लिशमध्ये संवाद साधला आहे. यावेळी त्यांची झालेली धमाल बघायला मिळत आहे.
आणखी वाचा – ‘दहावी अ’च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, एका दिवसांतच एक लाखांपेक्षा अधिक व्ह्युज, उत्सुकता शिगेला
धनंजयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघंही फिरायला जाताना दिसत आहेत. धनंजय व त्याचा मित्र पुण्याला एका कार्यक्रमासाठी जाताना दिसत आहेत. या प्रवासादरम्यान दोघांमध्ये इंग्रजीमध्ये झालेल धमाल संभाषण ऐकायला मिळत आहे. धनंजयच्या या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहे.
एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “तुमचं इंग्रजी खूपच भारी आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “पुण्यात येईपर्यंत असेच इंग्रजी बोला. टोमणे संपणार नाहीत”. या व्हिडीओने चाहत्यांना खळखळून हसवले आहे. धनंजय पोवार हा पहिल्यापासूनच पेशाने उद्योजक आहे. धाराशिव परिसरामध्ये त्याचा डी पी अमृततुल्य या नावाने चहाचा व्यवसाय आहे. धनंजय पोवार याने नवीन चहाचा व्यवसाय सुरु केल्याने तो चांगलाच चर्चेत आला होता. याशिवाय धनंजय पोवार यांच्या वडिलांचे ६० हजार स्क्वेअर फूट परिसरात सोसायटी फर्निचरचा खूप मोठा व्यवसाय आहे. सध्या धनंजय पोवार त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतात.