भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी संध्याकाळीवयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. दिल्ली येथील निगम बोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. अभिनेते अनुपम य खेर यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली. अशातच आता ट्विटरवर एक युद्ध सुरु झाले आहे,मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट भेटीस आला होता. यावरुन यावरुन अभिनेते अनुपम व चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्यामध्ये वाद सुरु झाले आहेत. नक्की काय झालं? ते जाणून घेऊया. (anupam kher on hansal mehta)
पत्रकार व लेखक वीर संघवी यांच्या पोस्टकडे लक्ष वेधले गेले. शुक्रवारी त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “जर तुम्ही मनमोहन सिंह यांच्याबद्दल बोलले गेलेलं खोटं जाणून घ्यायचं असेल की ‘द ॲक्सिडेंटल…’ चित्रपट पुन्हा बघितला पाहिजे. हा एक खराब चित्रपटच नाही तर मीडियाचा वापर करुन चांगल्या व्यक्तीचे नाव खराब कसे करावे? याचे एक उत्तम उदाहरण आहे”. वीर यांची ही पोस्ट हंसल यांनी रि-ट्विट केले आणि १०० टक्के असे लिहिले. यावर अनुपम खेर यांनी भलामोठा रिप्लाय केला आहे.
आणखी वाचा – “हफ्ते परवडत नाहीत म्हणून…”, गाडी विकल्यानंतर अंकिता वालावलकरला नेटकऱ्याने हिणवलं, म्हणाली, “बघत राहा की…”
— Hansal Mehta (@mehtahansal) December 27, 2024
अनुपम यांनी लिहिले की, “यामध्ये वीर संघवी ढोंगी नाहीत. कोणताही चित्रपट न आवडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण हंसल तर ‘द ॲक्सिडेंटल…’ चित्रपटाचे क्रिएटीव्ह हेड आहेत. ते इंग्लंडमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हजर होते. त्यांनी क्रिएटीव्ह इनपुट दिले आहेत आणि त्याची फीदेखील घेतली असेल. त्यामुळे वीर संघवी यांच्या प्रतिक्रियेवर १००% म्हणणं खूपच वेगळं वाटत आहे”.
The HYPOCRITE in this thread is NOT @virsanghvi. He has the freedom to not like a film. But @mehtahansal was the #CreativeDirector of #TheAccidentalPrimeMinister. Who was present at the entire shoot of the film in England! Giving his creative inputs and must have taken the fee… https://t.co/tkr3H1ChyX
— Anupam Kher (@AnupamPKher) December 27, 2024
पुढे ते म्हणाले की, “मी वीर संघवीशी सहमत आहे असं नाही. पण आम्ही चुकीचं काम करु शकतो. पण हे स्वीकारलं पाहिजे. हंसल मेहता यांच्या प्रमाणे काही निवडक लोकांकडून शाबासकी मिळवू नये. हंसल मेहता… मोठे व्हा!!! माझ्याकडे अजूनही चित्रिकरणाचे काही फोटो व व्हिडीओ आहेत ज्यामध्ये आपण एकत्र आहोत”. दरम्यान अनुपम यांच्या पोस्टवरदेखील हंसल यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, “अनुपम सर मी माझ्या चुका स्वीकारत आहे. मी माझे काम चोख करतो. तुम्ही मला काहीही बोलू शकता. जर मी चुकून तुम्हाला दु:ख पोहोचवलं असेल तर त्यासाठी क्षमा करा. याबद्दल आपण भेटून चर्चा करु आणि सगळे गैरसमज दूर करु”. दरम्यान या शाब्दिक युद्धावर नेटकऱ्यांनीदेखील अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.