बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळते. मॉडेलिंगपासून करियरला सुरुवात केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. खूप वर्ष हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. तिने आजवर अनेक हॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. यावर्षी तिची निर्मिती असलेला ‘पाणी’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारेने मुख्य भूमिका साकारली होती. ती लवकरच पुन्हा एकदा झोया अख्तरच्या हिंदी चित्रपटात दिसून येणार अशा चर्चा सुरु आहेत. मात्र आता प्रियांकाबद्दलची एक वेगळी अपडेट समोर आली आहे. (priyanaka chopra in ss rajmauli movie)
दक्षिणात्य चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या चित्रपटामध्ये प्रियांकाची वर्णी लागली आहे. यामध्ये तिच्याबरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू दिसून येऊ शकतो. आफ्रिकी जंगल अडव्हेंचर असलेल्या या चित्रपटाचे नाव अजून निश्चित झाले नाही. ‘पिंकविला’च्या माहितीनुसार,महेश बाबू भगवान हनुमानचा रिसर्च करणाऱ्या व्यक्तीची भूमिका सकारणार आहे. ‘बाहुबली’, ‘आरआरआर’ नंतरत त्यांचा हा मोठा प्रोजेक्ट असणार आहे. २०२५ साली या चित्रीकरण सुरु होणार आहे.
आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम डिपीचं इंग्रजी भाषेत तुफान संभाषण, तुम्हीही पोट धरुन हसाल, व्हिडीओ व्हायरल
तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, राजमौली यांचा चित्रपट पॅन इंडिया असणार आहे. तसेच हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे लेखन अंतिम टप्प्यात आले असून एप्रिल २०२५ पासून चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. राजमौली यांना चित्रपटाची मुख्य अभिनेत्री संपूर्ण जगभरात ओळखली जावी अशी इच्छा होती. त्यासाठी प्रियांका ही योग्य निवड ठरली. गेल्या सहा महिन्यांपासून संपर्कात आहेत.
आणखी वाचा – ‘दहावी अ’च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, एका दिवसांतच एक लाखांपेक्षा अधिक व्ह्युज, उत्सुकता शिगेला
प्रियांका आता तब्बल सहा वर्षांनी भारतीय मनोरंजन सृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. याआधी ती २०१९ साली ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसून आली होती. तसेच २०२१ साली ‘व्हाईट टायगर’ या ओटीटी चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात राजकुमार राव व गौरव दिसून आले होते. मात्र आता ती तेलुगू चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.