छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या शोला प्रेक्षकांकडून कायमच चांगला प्रतिसाद मिळत असतो. या शोच्या प्रत्येक पर्वाला व शोमधील स्पर्धकांना प्रेक्षकांकडून किंवा चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळत असते. अशातच ‘बिग बॉस’च्या ९व्या पर्वातील स्पर्धक प्रिया मलिकने तिच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. प्रियाने नुकतीच तिच्या प्रेग्नंसीबद्दल घोषणा केली आहे. अभिनेत्री पहिल्यांदाच आई होणार आहे.
‘ई-टाइम्स’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियाने तिच्या पहिल्या प्रेग्नंसीबद्दल व पहिल्या गर्भपाताबद्दलही भाष्य केलं आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला ती गरोदर राहिली. पण पहिल्या तीन महिन्यांतच तिचा गर्भपात झाला आणि तिला तिचे मूल गमावले याबद्दलही तिने या मुलाखतीत सांगितले. तसेच येत्या एप्रिल महिन्यात प्रिया तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याचेही तिने सांगितले.
या मुलाखतीत प्रियाने असं म्हटलं की, “इतक्या लवकर मला मूल नको होतं. मला नेहमीच आई व्हायचं होतं. पण मी पहिल्यांदा गरोदर होते. तेव्हा तीन महिन्यांतच माझा गर्भपात झाला आणि यात मी माझ्या मूल गमावले.” यापुढे ती असं म्हणाली की, “लोक गर्भधारणेबद्दल बोलतात परंतु गर्भपाताबद्दल कुणीच बोलत नाहीत. जेव्हा मी पुन्हा गरोदर राहिले. तेव्हा प्रत्येक अल्ट्रासाऊंड चाचणी माझ्यासाठी एक परीक्षा होती आणि या परीक्षेत मी कायम नापास होईल की काय? अशी भीती मला वाटत होती.”
आणखी वाचा – ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा, ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही पसंती
दरम्यान, प्रिया मलिक व उद्योगपती करण बक्षी यांचे २०२२ मध्ये लग्न झाले होते. अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी २००८ मध्ये तिचे भूषण मलिकबरोबर लग्न झाले होते, परंतु २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर तिने करणबरोबर तिचा दूसरा संसार थाटला.