शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नॉमिनेशचा त्रास होतोय”, वर्षा ताईंबरोबर निक्कीचं भांडण होताच नेटकरी भडकले, म्हणाले, “घराबाहेर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 11, 2024 | 12:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
निक्की व वर्षा ताई यांच्या  भांडणावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

निक्की व वर्षा ताई यांच्या भांडणावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व खूप चर्चेत आहे. या पर्वाचा सध्या सातवा आठवडा सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट दिसून आले आहेत. भंडाणं, मारमाऱ्या, एकमेकांवर ओरडणं अशा अनेक गोष्टी यामध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत अनेक स्पर्धक या शोमधून बाहेर पडले आहेत. या आठवड्यातदेखील सहा जणांची नावं नॉमिनेशनमध्ये आली आहेत.  यामध्ये वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्या नावाचाही सहभाग आहे. अशातच आता दोघीमधील भांडणं चांगलीच चर्चेत आली आहेत. (varsha usgaonkar and nikki tamboli fight)

सध्या ‘बिग बॉस…’मुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होताना दिसत आहे. यामध्ये सतत वाद होत असलेलेदेखील पाहायला मिळतात.  शो सुरु झाल्यापासून पाहिल्याच दिवशी निक्की व वर्षा यांच्यामध्ये वाद झालेले पाहायला मिळाले होते. नंतर अनेकदा त्यांच्यात वाद झाले. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्यामध्ये असलेली भंडाणं संपली. मात्र आता  पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. नुकताच एक नवीन प्रोमोसमोर आला आहे. यामध्ये किचनमधील कामांवरुन निक्की वर्षा यांच्याशी भांडताना दिसत आहे. वर्षा यांनी जेवण करताना भाज्या कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेल्या असल्याने निक्की त्यांना जाब विचारताना दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळीमध्ये पुन्हा वाजलं, जेवण बनवण्यावरुन टोकलं, म्हणाली, “लोकांना अन्न मिळत नाही आणि…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यामध्ये ‘इथे लोकांना अन्न मिळत नाही आणि इथे भाज्या फेकून देत आहेत”, असं निक्की म्हणत आहे. त्यावर मला ‘ती खराब वाटते’ असं वर्षा बोलताना दिसत आहे. त्यावर “तुम्ही किती वाईट स्वभावाच्या आहात हे दिसलं आहे”, त्यावर वर्षा म्हणतात की, “उगाच आरडाओरडा करुन काहीही सिद्ध होणार नाही”. त्यावर निक्की म्हणते की, “चला मग बाहेर जा. इथे येऊन बोंबाबोंब करु नका”. दरम्यान हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी निक्कीला पाठिंबा दिला आहे तर काहींनी वर्षा यांना पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अंकिताचा सूरजला फुल्ल सपोर्ट, टास्कदरम्यान थेट जान्हवीच्याही विरोधात गेली अन्…; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

एकाने लिहिले की, “नॉमिनेशन झालं की निक्की बिथरते म्हणून असे तमाशे करते”, तसेच अजून एकाने लिहिले की, “निक्कीला घराबाहेर काढायची वेळ आली आहे. हीचं अति झालं आहे आता”, तसेच अजून एकाने लिहिले की, “निक्कीला नॉमिनेशनचा त्रास होत आहे”. दरम्यान आता या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश कोणाची शाळा घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: bigg bossmarathi biss boss season 5nikki tambolivarsha usgaonkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 nikki and abhijeet frienship breaks down

Bigg Boss Marathi : निक्की-अभिजीतच्या मैत्रीला कायमचा तडा?, वैभवबाबतच्या चुगलीची केली पोलखोल अन्…; नेमकी चूक कोणाची?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.