मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : अंकिताचा सूरजला फुल्ल सपोर्ट, टास्कदरम्यान थेट जान्हवीच्याही विरोधात गेली अन्…; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 11, 2024 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 ankita walavalkar

सूरज चव्हाणला अंकिता वालावलकरने पाठिंबा देताच नेटकरी खुश

‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच दिलेल्या जादुई टास्क दरम्यान स्पर्धकांमधील चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी स्पर्धकांच्या गळ्यात एका स्पर्धकाचे नाव अडकवण्यात आलं होतं आणि खेळामध्ये या स्पर्धकांना न दाखवलेली मेहनत कशी होती, खेळात हा स्पर्धक अपात्र कसा आहे याची कारणे देऊन त्या स्पर्धकाला नॉमिनेट करायचे होते. या जादुई टास्कमध्ये अंकिता वालावलकरच्या गळ्यात जान्हवी किल्लेकरची पाटी अडकवण्यात आली होती. त्यामुळे योग्य ते कारण देऊन जान्हवीला नॉमिनेट करण्याची संधी अंकिताजवळ होती. (Bigg Boss Marathi Season 5)

जादुई दिव्या पर्यंत जान्हवीला बचावण्यासाठी अंकिता पोहचू शकत नाही तेव्हा तिला कारण देऊन जान्हवीला नॉमिनेट करणं भाग पडतं. तेव्हा अंकिता वैयक्तिक कारण देत जान्हवीला नॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते. जादुई दिव्यापर्यंत न पोहचल्याने अंकिता या फेरीतून बाद झालेली पाहायला मिळते आणि अंकिताने यावेळी वैयक्तिक कारण म्हणजेच गेला कॅप्टनसी टास्क दरम्यान झालेल्या वादाचं कारण देत जान्हवीला नॉमिनेट केलं असल्याचं पाहायला मिळतंय. अंकिताने जान्हवीला सूरज कॅप्टन झाल्यावर तो कॅप्टन पदासाठी लायक नसल्याचे म्हटलं होत त्यामुळे जान्हवी सगळ्यांनाच पाण्यात बघते असं कारण देत तिने नॉमिनेट केलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पार पडला नवीन नॉमिनेशन टास्क, ‘या’ चार स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार? कोण जाणार घराबाहेर?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

टास्कदरम्यान अंकिताने गुलीगत फेम सूरजसाठी स्टॅण्ड घेतला. गेल्या आठवड्यात घरात झालेल्या कॅप्टन्सी कार्यात जान्हवीने “सूरज कॅपेबल नाही” असं म्हटल्याने अंकिताला वाईट वाटलं. अखेर आज संधी मिळताच अंकिताने जान्हवीला नॉमिनेट केलं आणि सूरजच्या वतीने खंबीरपणे बाजू मांडली. मात्र, नॉमिनेशनसाठी वैयक्तिक नव्हे, तर फक्त खेळासंदर्भातील निकष द्यायचे होते. अंकिताने योग्य कारण न दिल्याने तिचं मतं रद्द करण्यात आलं. तरीही ‘बी टीम’ने शेवटपर्यंत हार मानली नाही. याउलट सूरजची खंबीरपणे बाजू घेतल्याने नेटकरी अंकिताचं भरभरुन कौतुक करत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळीमध्ये पुन्हा वाजलं, जेवण बनवण्यावरुन टोकलं, म्हणाली, “लोकांना अन्न मिळत नाही आणि…”

दरम्यान, टास्क दरम्यान अंकिताने सूरजची बाजू घेतल्यामुळे या आठवड्यात अंकिताला सेफ करा अशी मागणी केली जात आहे. अंकिताला सूरजच्या चाहत्यांचा पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. अनेक नेटकरी अंकिताने जिंकली नसली तरी तिने सूरजची साथ दिली, म्हणून तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

Tags: ankita walavalkarbigg boss marathiBigg Boss Marathi  Season 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 abhijeet sawant and nikki tamboli fight

Bigg Boss Marathi : निक्की-अभिजीतचं वाजलं, दोघांमध्ये बोलणं अंकिताला पडलं महागात, उलट तिलाही सुनावलं, म्हणाला, "तू काय केलं ते बघ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.