सध्या ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व खूप चर्चेत आहे. या पर्वाचा सध्या सातवा आठवडा सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट दिसून आले आहेत. भंडाणं, मारमाऱ्या, एकमेकांवर ओरडणं अशा अनेक गोष्टी यामध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत अनेक स्पर्धक या शोमधून बाहेर पडले आहेत. या आठवड्यातदेखील सहा जणांची नावं नॉमिनेशनमध्ये आली आहेत. यामध्ये वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्या नावाचाही सहभाग आहे. अशातच आता दोघीमधील भांडणं चांगलीच चर्चेत आली आहेत. (varsha usgaonkar and nikki tamboli fight)
सध्या ‘बिग बॉस…’मुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होताना दिसत आहे. यामध्ये सतत वाद होत असलेलेदेखील पाहायला मिळतात. शो सुरु झाल्यापासून पाहिल्याच दिवशी निक्की व वर्षा यांच्यामध्ये वाद झालेले पाहायला मिळाले होते. नंतर अनेकदा त्यांच्यात वाद झाले. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्यामध्ये असलेली भंडाणं संपली. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. नुकताच एक नवीन प्रोमोसमोर आला आहे. यामध्ये किचनमधील कामांवरुन निक्की वर्षा यांच्याशी भांडताना दिसत आहे. वर्षा यांनी जेवण करताना भाज्या कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेल्या असल्याने निक्की त्यांना जाब विचारताना दिसत आहे.
यामध्ये ‘इथे लोकांना अन्न मिळत नाही आणि इथे भाज्या फेकून देत आहेत”, असं निक्की म्हणत आहे. त्यावर मला ‘ती खराब वाटते’ असं वर्षा बोलताना दिसत आहे. त्यावर “तुम्ही किती वाईट स्वभावाच्या आहात हे दिसलं आहे”, त्यावर वर्षा म्हणतात की, “उगाच आरडाओरडा करुन काहीही सिद्ध होणार नाही”. त्यावर निक्की म्हणते की, “चला मग बाहेर जा. इथे येऊन बोंबाबोंब करु नका”. दरम्यान हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी निक्कीला पाठिंबा दिला आहे तर काहींनी वर्षा यांना पाठिंबा दिला आहे.
एकाने लिहिले की, “नॉमिनेशन झालं की निक्की बिथरते म्हणून असे तमाशे करते”, तसेच अजून एकाने लिहिले की, “निक्कीला घराबाहेर काढायची वेळ आली आहे. हीचं अति झालं आहे आता”, तसेच अजून एकाने लिहिले की, “निक्कीला नॉमिनेशनचा त्रास होत आहे”. दरम्यान आता या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश कोणाची शाळा घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.