सध्या ‘बिग बॉस’चे १८ वे पर्व खूप चर्चेत आहे. यामध्ये एकूण १८ स्पर्धक सहभागी झाले होते. या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करत आहे. या पर्वाचा पहिला विकेंड नुकताच झाला. यावेळी पहिल्या आठवड्यात चाहत पांडे, मुस्कान बामणे, गुणरत्न सदावर्ते, करणवीर मेहरा व अविनाश मेहरा हे सदस्य नॉमिनेट झाले होते. मात्र यामधील एकही स्पर्धक घराबाहेर गेला नाही. पण यावेळी खूप धमाल झालेलीदेखील दिसून आली. यावेळी ‘लाफ्टर शेफ’चे काही कलाकारदेखील दिसून आले. तसेच ‘विद्या और विकी का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटातील कलाकारदेखील उपस्थित होते. (bigg boss weekend)
यावेळी सलमानने घरातील काही सदस्यांची शाळा घेतली. तसेच सलमानने काही लोकांची स्तुतीदेखील केली आहे. नायरा बॅनर्जीला तिच्या काही चुकादेखील दाखवून दिल्या आहेत. तसेच शिल्पा शिरोडकर यांना सांगितले की ही केवळ सुरुवात आहे पुढचा प्रवास अजून कठीण आहे. तसेच घरातील सडस्यांमध्ये वाद-विवाददेखील पाहायला मिळाले.
यावेळी ‘बिग बॉस’ च्या सेटवर अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री तृप्ती डीमरी यांनी हजेरी लावली होती. दोघांनीही सलमानच्या गाण्यावर डान्स केला आणि खूप धमालदेखील केली. तसेच राजकुमार व तृप्ती यांची घरातल्या सडस्यांबरोबर ओळखदेखील करुन दिली. यावेळी गुणरत्न यांनी डायलॉगबाजी करुन सगळ्यांचेच मनोरंजन केले.
यानंतर भारती सिंह, कृष्णा अभिषेक व सुदेश लहरी यांचीदेखील एंट्री पाहायला मिळाली. तिघांनी मिळून सलमानबरोबर खूप धमालदेखील केली. तसेच सलमानबरोबर जेवणदेखील बनवले. त्याने पराठे बनवले असून सगळं काम स्वतःच केले. सलमानने पराठे एकदम गोल बनवले आहेत. त्याने बनवलेले पराठे सगळ्यांनाच आवडले. तसेच यानंतर कोण घराबाहेर जाणार? याबद्दल सांगितले. यानंतर गधराज घराबाहेर जाणार असून १८ सदस्य मात्र घरातच राहतील हे स्पष्ट केले. दरम्यान आता हा येता आठवडा कसा राहणार? आणि दुसऱ्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.