‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता सूरज चव्हाण याची महाराष्ट्रभर चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतरही सूरज चव्हाण ट्रेडिंगला आहे. अशातच सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी सूरज चव्हाण याला घर बांधून देण्यासह इतर सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर अजित पवार यांनी नुकतीच याबद्दल घोषणाही केली आहे. यावेळी अजित पवार सूरजसाठी 2BHK घर बांधणार असल्याचे सांगितले सोशल मीडियावर अजित पवारांच्या या घोषणेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Suraj Chavan Financial Misappropriation Post)
या व्हायरल व्हिडीओमध्ये अजित पवारांच्या संभाषणाच्या व्हिडीओबरोबरच एक QR कोडही देण्यात आला आहे आणि यावर सूरजला पैसे पाठवण्याचे आवाहनदेखील केले जात आहे. पण संधीचा फायदा घेत काही जणांकडून सूरजच्या मदतीच्या निमित्ताने पैसे उकळले जात आहे. याबद्दल सूरजच्या सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेयर करण्यात आली आहे. तसंच या पोस्टमधून असे कृत्य करण्याऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचेदेखील सांगण्यात आले आहे.
सूरजच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “नमस्ते मी आपल्या महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण. मागील काही तासांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून त्यामध्ये ‘आम्ही सूरजला आर्थिक मदत करणार आहोत दिलेला कोड स्कॅन करून पैसे पाठवा आणि ही आर्थिक मदत आम्ही निश्चित त्याच्यापर्यंत पोहोचवू’. असं म्हटलं आहे.”
आणखी वाचा – कुष्ठरोगी, अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा मदतीचा हात, अभिनेत्रीचं कौतुकास्पद काम, व्हिडीओद्वारे म्हणाली…
यापुढे त्याने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “अशा पद्धतीच्या त्या पोस्ट असून माझ्या नावाचा फेक आयडी काढून पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तरी अशा फेक पोस्टला फॅन्सने बळी पडू नये ही विनंती. जे कोणी या पोस्ट टाकत आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल”. दरम्यान, सूरजच्या प्रसिद्धीचा व लोकप्रियतेचा अनेकांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसत आहे.
सूरज चव्हाणला घर देणार असल्याच्या घोषणेबरोबरच अजित पवाराणी त्याचा सत्कारही केला. यावेळी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी सूरजच्या प्रवासाविषयी माहिती घेतली. तसंच भविष्यात काय करणार विचारपूस करत जमेल ते सहकार्य करणार असल्याचा शब्दही दादांनी यावेळी सूरज चव्हाणला दिला.