हिंदी टेलिव्हिजन शो ‘बिग बॉस’चे नवीन पर्व नुकतेच सुरु झाले आहे. मनोरंजन तसेच इतर क्षेत्रातील अनेक दिग्गज या पर्वामध्ये सहभागी झाले आहेत. सध्या पाहिलाच आठवडा सुरु आहे. पण पहिल्या दिवसांपासूनच यामध्ये वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळाली. अशातच आता नॉमिनेशनचा टास्क सुरु झाला आहे. यादरम्यान विवयन दसेना व चाहत पांडे यांच्यामध्ये वाद पाहायला मिळणार आहे तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तुरुंगात जाण्यास नकार देणार असून ते अन्न-पाण्याचा त्यागणार असल्याचेखील समोर आले आहे. हा प्रोमो समोर आल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’मध्ये काय पाहायला मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. (bigg boss 18 new promo)
‘बिग बॉस १८’चा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये या पर्वाचा पहिला नॉमिनेशन टास्क होणार आहे. यावेळी एका बोर्डवर फोटो लावलेले असतात आणि त्यावर धनुष्यबाण मारायचा असतो. यावेळी करणवीर मेहरा गुणरत्न यांच्या फोटोवर बाण मारतो आणि म्हणतो की, “यांचा गेम वेगळा आहे. ते काय करतात हे समजत नाही”, त्यावर गुणरत्नदेखील करणवीरला नॉमिनेट करतात आणि म्हणतात की मी याला ओळखत नाही”. दरम्यान दोघांमध्येही शाब्दिक वादावादी झालेली पाहायला मिळते.
यानंतर चाहत पांडेदेखील विवियनला नॉमिनेट करते आणि म्हणते की, “विवियन खूप गर्विष्ठ आहे”, हे ऐकून विवियन म्हणतो की, “गर्व तेव्हाच येतो जेव्हा समोरचा चुकीच्या पद्धतीने बोलत असतो”. यानंतर या दोघांमध्येही खूप वाद होतात.
तसेच या प्रोमोमध्ये दाखवले आहे की, करण, ईशा व अविनाशला एक विशेष अधिकार मिळतो. हे तिघंही जो सदस्य निवडतील तो तुरुंगात राहील. करणने गुणरत्न यांचे नाव घेतले पण त्यांना ते मान्य नव्हते. ते याला नकार देतात आणि खूप चिडलेलेदेखील दिसत आहेत. दरम्यान आता या टास्कमध्ये काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच कोणता सदस्य काय पाऊल उचलणार? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.