Arati Solanki On Trolling : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता ठरल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक क्षेत्रातून सूरजचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून येऊन इथपर्यंत पोहोचल्याबद्दल काहींनी त्याचं कौतुक केलं तर सहानुभूती म्हणून सूरजला ट्रॉफी दिल्याचं मत अनेकांनी दिलं. ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासून सूरज चव्हाण हे नाव चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. ‘टिक टॉक स्टार सूरज चव्हाण ‘बिग बॉस’च्या घरात येताच अनेकांनी टीका केलेलीही दिसली.
काही कलाकार मंडळींनी सूरजच्या विजेतेपदावर आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात स्पर्धक राहिलेली अभिनेत्री आरती सोळंकीची सूरज विजयी होण्यानंतरची पोस्ट लक्षवेधी ठरली.
आणखी वाचा – Video : मैत्री असावी तर अशी! घरी पोहोचताच डीपीने मित्रांना भरवलं जेवण, साधेपणाचं सर्वत्र कौतुक
सूरज जिंकल्यानंतर आरतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर उपरोधिक पोस्ट लिहिली. “मी गरीब आहे”, अशी पोस्ट लिहित तिने कॅप्शनमध्ये असं म्हटलं की, “छपरीपणा सुरु करायला हवा”. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत. आरतीची ही पोस्ट पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा – अंकिता वालावलकर होणाऱ्या नवऱ्याची सगळ्यांना ओळख करुन देणार, तारीखही ठरली, ‘त्या’ व्यक्तीच्या नावाची चर्चा
अभिनेत्रीच्या या पोस्टवर एका युजरने, “तू गरीब आहे तर धंदा कर. तिच तुझी लायकी आहे”, असं म्हटलं आहे. हा कमेंटचा स्क्रीनशॉट तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. याखाली तिने कॅप्शनमध्ये असं म्हटलं की, “या सूरज चव्हाणला वोट करणारे कोण आहेत ते बघा. हे फार वाईट आहे. एका शोबद्दल एक मुलगी तिचं मत मांडू शकत नाही. हे ट्रोलर्स छपरी आहेत”, असं म्हणत त्या नेटकऱ्याला सुनावलं आहे.