रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“टाइट कपडे परिधान करतेस तेव्हा…”, मुनव्वर फारुकीने अरमान मलिकची पत्नी कृतिकाला सुनावलं, रडू लागली अन्…; काय घडलं?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 30, 2024 | 12:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss OTT 3 Munawar Farooqui slams Armaan Malik's wife Kritika for wearing tight clothes know more

"टाइट कपडे परिधान करतेस तेव्हा…", मुनव्वर फारुकीने अरमान मलिकची पत्नी कृतिकाला सुनावलं, रडू लागली अन्…; काय घडलं?

‘बिग बॉस ओटीटी ३’ हा शो आता अंतिम टप्प्याच्या दिशेने जात आहे. बिग बॉस ओटीटीचा महाअंतिम सोहळा जवळ आला असून घरातील स्पर्धकांमध्ये अंतिम लढतीसाठी चुरस पाहायला मिळत आहे. या  घरात आल्याच्या पाहिल्या दिवसापासून् अरमान मालिका व त्याच्या पत्नी चर्चेत आहेत, अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने काही दिवसांपूर्वीच घरातून निरोप घेतला. मात्र तीची दुसरी पत्नी कृतिका व तो या घरात अजूनही आहे. या जोडीच्या अनेक बातम्यांनी सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये धुमाकूळ घातला. तथापि, महाअंतिम सोहळ्याच्या आधी या दोघांना रिॲलिटी चेक दिले आणि त्यांना त्यांच्या बाँडबद्दल काही कठीण प्रश्न विचारले. ज्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतंच या घरात मुनव्वर फारुकी आला होता. तेव्हा यात त्याने कृतिका मलिकला जिमचे कपडे परिधान केल्याबद्दल प्रश्न केला. अलीकडेच मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस ओटीटी ३’ शोमध्ये प्रवेश केला. तेव्हा मुनव्वर कृतिकाशी संभाषण करताना दिसला आणि त्याने तिला तिच्या दुटप्पीपणाबद्दल प्रश्न विचारला. मुनव्वरने तिला “जर ती सोशल मीडियावर इतक्या लोकांसमोर स्वत:चे व्हिडीओ शेअर करते मग इथे कोणी तिची स्तुती केली तर ती ओव्हर रिऍक्ट का करते?” असं विचारलं.

View this post on Instagram

A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)

आणखी वाचा – नेत्राच्या पोटातून अद्वैतला ऐकू आली विचित्र वीणा व किंचाळी, नेत्रा व बाळ वाचणार का?

मुनव्वर असं म्हणाला की, “तुमचा सोशल मीडियावर एक रील व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात तुम्ही जिमचे घट्ट कपडे परिधान केलेले आहेत. यामुळे तुम्ही सोशल मीडियावर स्वत:ला एक्सपोज करता असे तुम्हाला वाटत नाही का? जे की चुकीचे नाही. पण मग मला असं वाटतं की, तुम्ही सोशल मीडियावर स्वत:ला एक्सपोज करता आणि इथे जर कोणी तुमची स्तुती केली तर त्यात काय अडचण आहे?”.

आणखी वाचा – आजारपणात वडील गेले, धक्क्याने आई व आजीचंही निधन अन्…; सुरज चव्हाणने सांगितली खरी परिस्थिती, म्हणाला “काही बहिणी वारल्या तेव्हा…”

यापुढे मूनव्वरने अरमान मलिकचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी मुनव्वरने अरमानला पहिली पत्नी पायल मलिकबद्दल विचारले. पायलला माध्यमांनी घटस्फोटाबद्दल विचारले तेव्हा तिने त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. ज्यावर अरमान म्हणाला की, “जो वाईट काळात साथ सोडून गेला नाही तो चांगल्या काळातही सोडून जाणार नाही”.

Tags: Bigg Boss OTT 3Kritika MalikMunawwar Faruqui
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi new season update Nikki Tamboli and Ankita Walawalkar will fight know more

"अंकिताने माझ्याकडे बघून तोंड वाकडं केलं", निक्की तांबोळीला कोकण हार्टेड गर्लचं वागणं पटेना, पहिल्याच दिवशी मतभेद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.